मालवण - तारकर्ली रस्ता दुरावस्थेबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट.
मालवण - तारकर्ली रस्ता दुरावस्थेबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण - तारकर्ली भागातील रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने आणि भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी खोदलेला रस्ता दुरुस्त न केल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने भाजप पदाधिकाऱ्यांसह स्थानिक ग्रामस्थांनी गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. नोव्हेंबर अखेरपर्यंत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. याबाबतचे निवेदनही त्यांना सादर करण्यात आले आहे अशी माहिती मिळत आहे.
मालवण तारकर्ली - देवबाग रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत असून पर्यटक आणि स्थानिकांना ये - जा करताना प्रचंड अडथळा होत आहे. झाडी वाढल्यामुळे रस्त्याच्या बाजूने वाहने घेणेही शक्य होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी तातडीने झाडी तोडण्याची मागणी केली आहे असे समजते आहे.
यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी उपसरपंच श्याम झाड, देवानंद लोकेगावकर, मिलिंद झाड, तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, रुपेश सातार्डेकर, नारायण लुडबे, हरेश पडवळ, लीलाधर झाड, अमित झाड आदी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...