ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
माजी नगरसेवक जाॅन नऱ्होना यांचा शिवसेना पक्षप्रवेश.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

माजी नगरसेवक जाॅन नऱ्होना यांचा शिवसेना पक्षप्रवेश.

प्रकाशन: 06 Nov 2025 04:49 PM
वाचन संख्या 432

माजी नगरसेवक जाॅन नऱ्होना यांचा शिवसेना पक्षप्रवेश. 


जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शहरप्रमुख दीपक पाटकर, मच्छीमार आघाडी जिल्हाप्रमुख राजा गावकर, शहर संघटक राजू बिडये व पदाधिकारी उपस्थित.


मालवण | ब्यूरो न्यूज : दोन टर्म नगरसेवक पद भूषवलेले मालवणचे माजी नगरसेवक जाॅन  नऱ्होना यांनी गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी कुंभारमाठ सरपंच पूनम वाटेगांवकर आणि मनोज वाटेगावकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. 



शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले, अशी माहिती मिळत आहे. 


आमदार निलेश राणे यांची विकास कामांची मालिका आणि त्यांच्या कार्यावर प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे प्रवेशकर्त्यांनी स्पष्ट केले असे समजते आहे. 


यावेळी शहरप्रमुख दीपक पाटकर, मच्छीमार आघाडी जिल्हाप्रमुख राजा गावकर, मधुकर चव्हाण, महेश सारंग, संदीप भोजने, राजन परुळेकर, शहर संघटक राजू बिडये, मच्छिमार आघाडी तालुकाप्रमुख भाऊ मोर्जे, सुरज बिरमोळे, जमा डायस आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स