कवी अशोक मिठबांवकर 'सम्राट अशोक काव्यरत्न' पुरस्काराने सन्मानित.
कवी अशोक मिठबांवकर 'सम्राट अशोक काव्यरत्न' पुरस्काराने सन्मानित.
मसुरे | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील मिठबांवचे कवी अशोक आप्पा मिठबांवकर यांना लातूर येथे राज्यस्तरीय 'सम्राट अशोक काव्यरत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला. सम्राट अशोक साहित्य व सांस्कृतिक मंच लातूर आयोजित दुसरे राज्यस्तरीय कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा लातूर या ठिकाणी संपन्न झाला.
साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना सम्राट अशोक साहित्य व सांस्कृतिक मंच जिल्हा लातूर महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे काव्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ कवी लेखक भारत सातपुते, संजय घाडगे, ॲड. विजयकुमार कस्तुरे, डॉ. बबनराव महामुने, डॉ. व्ही. बी. खरात, अंकुश पडधान,कुसुक महिरे, प्रमोद उबाळे आदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा.
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्...
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर यांच्या कवितांचा जागर.
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर...
आमदार निलेश राणे यांची मागणी आणि जिल्ह्यात दशावतार कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातले अधिकारी दाखल