ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
मालवणातील मरीन सॅन्क्शुअरी बाबत एस. व्ही. रामाराव यांची देवबाग येथील कार्यशाळेत महत्वाची माहिती.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवणातील मरीन सॅन्क्शुअरी बाबत एस. व्ही. रामाराव यांची देवबाग येथील कार्यशाळेत महत्वाची माहिती.

प्रकाशन: 05 Nov 2025 06:22 PM
वाचन संख्या 175

मालवणातील मरीन सॅन्क्शुअरी बाबत एस. व्ही. रामाराव यांची देवबाग येथील कार्यशाळेत महत्वाची माहिती.


मालवण | ब्यूरो न्यूज : देवबाग येथे ओशन ब्लिस हॉटेलच्या सभागृहात कांदळवन विभाग, वनविभाग, कांदळवन प्रतिष्ठान, आणि बॉम्बे नाचरळ नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने समुद्री जीवांबाबत प्रतिसाद आणि संवर्धन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 


मालवण मरीन सेंचुरी रद्द करणे सोपे काम नाही. स्थानिक परिस्थिती विचारात घेता वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने या सेंच्युरीचे क्षेत्र तितकेच ठेवून पुनर्रचना तयार केली आहे. स्थानिक उपजीविकेच्या घटकांना विचारात घेऊनच मालवण मरीन सेंचुरीला मूर्त स्वरूप दिले जाणार असल्याची माहिती राज्याच्या कांदळवन विभागाचे अपर प्रधान मुख्य वन संरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी दिली. त्याचप्रमाणे वन परिक्षेत्र मालवण मधील सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार असून स्थानिकांशी संवाद राखण्यासाठी दर तीन महिन्यातून एकदा विभागामार्फत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Article image


यावेळी सामाजिक वनीकरणच्या प्रादेशिक वन अधिकारी वर्षा कोळेकर, उपसंचालक कांदळवन प्रतिष्ठान मानस मांजरेकर, डी एफ ओ राजेंद्र मगदूम, डॉ. दिनेश विन्हरकर, विभागीय वन अधिकारी (दक्षिण कोकण) कांचन पवार, उपसंचालक- वेटलँड्स प्रोग्राम, BNHS. डॉ. सथियासेल्वम, दक्षिण कोकण सहाय्यक वनसंरक्षक कांदळवन विभाग प्रियंका पाटील, सुनील सावंत, सत्यवान सुतार परिमंडळ वन अधिकारी, संदीप कुंभार सुहास पाटील वनक्षेत्रपाल, मोहन उपाध्ये, श्रीरंग परीट, सदानंद परब, सावळा कांबळे वनपाल, एम एम बी, मत्स्य विभाग यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.


यावेळी रामराव म्हणाले, किनारपट्टीवरील सागरी जीवांचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कांदळवन विभाग कटिबद्ध आहे. या कार्यात स्थानिकांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. कांदळवन विभाग आणि स्थानिकांमध्ये सुसंवाद निर्माण झाला पाहिजे. यासाठी स्थानिक पर्यावरण मित्र आणि प्रशासनाचे संबधित विभागाचे अधिकारी मिळून एक व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. या माध्यमातून दर तीन महिन्यातून किमान एकदा बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.


जखमी सागरी जीवांसाठी तत्काळ उपचार मिळत नसल्यामुळे स्थानिक पातळीवर उपचार केंद्र सुरू करावेत व यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी आणि प्राणी ॲम्बुलन्स उपलब्ध करण्यात येईल. सागरी जीवांच्या बचाव कार्यात स्थानिकांना अनेकदा अडचणी येतात यासाठी रेस्क्यू उपकरणे खरेदीसाठी मंजुरी देण्यात येत आहे. मालवण येथील कार्यालयामधील रिक्त पदे भरण्यात येतील असेही श्री. रामराव यावेळी म्हणाले. या चर्चासत्रात अक्षय रेवंडकर आणि सदस्यांनी भाग घेतला.


कार्यशाळेत सागरी सस्तन प्राण्यांची ओळख, जखमी अवस्थेत किनाऱ्यावर आल्यास कसे हाताळणे, जलचर मोबाईल ॲपचा वापर, जखमी समुद्री कासवांची हाताळणी, समुद्री पक्षांचे व्यवस्थापन, मच्छीमारांची नुकसान भरपाई योजना, समुद्री कासवाचे संवर्धन, आदी विषयांवर तज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.


सौजन्य | मालवण ब्यूरो 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स