मालवणमध्ये 'रन फॉर युनिटी' एकता दौड उत्साहात.
मालवणमध्ये 'रन फॉर युनिटी' एकता दौड उत्साहात.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य.
मालवण | ब्यूरो न्यूज : राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधत शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी पोलीस दलाच्या वतीने 'रन फॉर युनिटी' एकता दौड आयोजित करण्यात आली होती. या भव्य दौडला नागरिक, विविध संस्थांचे सदस्य आणि पोलीस दलातील अधिकारी - कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या संकल्पनेतून आणि येथील पोलीस ठाण्याच्या वतीने देऊळवाडा ते रेवतळे तिठा ते देऊळवाडा अशी 'एकता दौड' संपन्न झाली.
दौड सुरू होण्यापूर्वी संस्था प्रतिनिधींचे स्वागत मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी केले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्रीमती खोत यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
यावेळी पोलीस निरीक्षक श्री. जगताप म्हणाले, "भारताच्या स्वातंत्र्यानंतर जी संस्थाने होती ती वेगवेगळी होण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखंडता आणि पूर्वीचा हिंदुस्थान हा अखंड राहावा यासाठी प्रयत्न करून एक अखंड भारताची संकल्पना मांडली. त्यामुळे या लोहपुरुषाच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन एकता दौड काढत साजरा केला जात आहे."
या दौडमध्ये पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, तसेच मालवण पत्रकार समिती पदाधिकारी श्री. कृष्णा ढोलम, श्री. अमित खोत, श्री. प्रशांत हिंदळेकर, आप्पा मालंडकर व पदाधिकारी आणि सदस्य तसेच आस्था ग्रुप अध्यक्ष श्री. उमेश मांजरेकर, श्री. सौगंधराज बादेकर, चौके सरपंच श्री. पी. के. चौकेकर आणि विविध संस्थांचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पोलीस कर्मचारी श्री. सुशांत पवार यांनी केले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...