ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
गोळवण - कुमामे - डिकवल ग्रामपंचायत येथे ग्रामसभा संपन्न.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

गोळवण - कुमामे - डिकवल ग्रामपंचायत येथे ग्रामसभा संपन्न.

प्रकाशन: 31 Oct 2025 07:02 AM
वाचन संख्या 149

गोळवण - कुमामे - डिकवल ग्रामपंचायत येथे ग्रामसभा संपन्न. 


खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत.


ग्रामपंचायत आराखड्याबाबत चर्चाविनिमय होऊन आराखडा अंतिम.

   

मसुरे | प्रतिनिधी : ग्रामपंचायत कार्यालय गोळवण - कुमामे - डिकवल येथे ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी १५५ ग्रामस्थ उपस्थित होते. सभेत,'सर्वांची योजना,सर्वांचा विकास सन २०२६ -२७, च्या ग्रामपंचायत आराखड्याबाबत चर्चाविनिमय होऊन आराखडा अंतिम करण्यात आला. 

Article image


या सभेत तिन्ही गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे त्वरीत फार्मर आयडी, ई - पीक पाहणी ॲप याबाबत चर्चा करण्यात आली. सभेत आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजना कामाबाबत चर्चाविनिमय होऊन आराखडा अंतिम करण्यात आला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्याबाबत प्रयत्न करणारे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे व कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.


या सभेत उपस्थित ग्रामस्थांचे स्वागत ग्रामपंचायत अधिकारी सौ. प्रियंका मनवर यांनी केले तर सरपंच श्री. सुभाष लाड यांनी आभार प्रदर्शन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स