सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने व मालवण पोलिस ठाणे यांच्या माध्यमातून 'रन फॉर युनिटी' एकता दौडचे ३१ ऑक्टोबर रोजी आयोजन.
सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने व मालवण पोलिस ठाणे यांच्या माध्यमातून 'रन फॉर युनिटी' एकता दौडचे ३१ ऑक्टोबर रोजी आयोजन.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य.
मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने व मालवण पोलीस ठाण्याच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मालवण शहरात ३१ ऑक्टोबरला सकाळी ७ ते ९ यावेळेत देऊळवाडा ते रेवतळे तिठा ते देऊळवाडा अशी भव्य 'रन फॉर युनिटी' एकता दौड आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली.
या राष्ट्रीय एकात्मतेच्या जागरणात मालवण पोलीस ठाण्यातील अधिकारी - अंमलदार आणि पोलीस पाटील यांच्यासह शहरातील मालवण पत्रकार समिती, आस्था गृप आणि विविध सेवाभावी संस्था व नागरिक सहभागी होणार आहेत अशी माहिती मिळत आहे..
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी सर्व नागरिकांनी पांढरे टी - शर्ट आणि ट्रॅक पँट अशा पेहरावात सहभागी व्हावे. या भव्य 'रन फॉर युनिटी' मध्ये सहभागी होऊन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री. जगताप यांनी केले आहे अशी माहिती मिळत आहे.
सौजन्य : मालवण ब्यूरो
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम कडून 'छापील वृत्तपत्र खरेदीवरील निर्बंधाचा निर्णय' तातडीने मागे घ्यायची शासनाकडे मागणी.
मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मोफत BMD (बोन मिनरल डेन्सिटी)तपासणी शिबिर.
मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मो...
श्रीक्षेत्र दत्त मंदिर, मूळस्थान – वायरी बांध येथील श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर.
रुजारिओ पिंटो यांच्या 'माॅं मेरी' हिंदी काव्यसंग्रहाचा १५ ऑगस्टला प्रकाशन सोहळा.