ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
पळसंब कार्यक्षेत्रातील शेतकरी ग्रामस्थांसाठी 'फार्मर आयडी शिबिर' संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पळसंब कार्यक्षेत्रातील शेतकरी ग्रामस्थांसाठी 'फार्मर आयडी शिबिर' संपन्न.

पळसंब कार्यक्षेत्रातील शेतकरी ग्रामस्थांसाठी 'फार्मर आयडी शिबिर' संपन्न.

Article image

पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचे शिबिराच्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त.


आचरा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब येथे १३ जून २०२६ रोजी पळसंब ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शेतकरी ग्रामस्थांचे फार्मर आयडी काढण्यासाठी विशेष शिबीर तथा कॅम्प संपन्न झाला. यावेळी पळसंब ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत गोलतकर, तलाठी सुवर्णा खुपसे, ग्रामपंचायत कर्मचारी शैलेंद्र अणावकर, सीएससी केंद्राचे केंद्र चालक श्री. घाडी व त्यांच्या सहकारी अनुष्का सावंत, शेतकरी रमेश परब, रविकांत पाडावे, कृष्णा सावंत, लक्ष्मण साईल, रामप्रसाद पळसंबकर, सुनेत्रा साईल, पंढरी परब, बाळा सावंत उपस्थित होते. 


पळसंब ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी ह्या शिबिराच्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्‍त केले तसेच मुंबईतून देखील मोबाईल द्वारे माहिती उपलब्ध करून फार्मर आयडी काढण्यात आले अशी माहिती दिली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स