ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
तालुक्यातील स्वयंचलित   हवामान केंद्र ग्रामीण स्तरावर हलवण्याची मागणी.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र ग्रामीण स्तरावर हलवण्याची मागणी.

मालवण तालुक्यातील स्वयंचलित 

हवामान केंद्र ग्रामीण स्तरावर हलवण्याची मागणी. 

Article image



पालकमंत्री नितेश राणे यांना

तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिले निवेदन.



मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील आचरा, कोळंब व मालवण या ग्रामीण मंडळातील शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून पीक विम्यापासून वंचित राहत आहेत. याबाबत भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदन दिले आहे. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्यासमवेत तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, राजू परुळेकर, विजय निकम, महेंद्र चव्हाण उपस्थित होते अशी माहिती मिळत आहे.


मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र समुद्रापासून जवळ असल्यामुळे या ग्रामीण मंडळातील हवामान बदल या केद्रात नोंदवले जात नाहीत. सन २०२२ - २३ मध्ये महावेद प्रकल्प अंतर्गत वेंगुर्ला तहसील कार्यालयासमोर असलेले स्वयंचलित हवामान केंद्र बदलून कुशेवाडा येथे नेण्यात आले होते. त्याचप्रमाणे मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र बदलून ग्रामीण स्तरावर नेण्यात यावे जेणेकरून ग्रामीण स्तरावरील सर्व शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळू शकेल, अशी मागणी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी मंत्री नितेश राणे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स