ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
मळगावात ग्रामविकास परीवर्तन सेनेच्या बैठकीत गावात ‘१००% परिवर्तन’चा नारा.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मळगावात ग्रामविकास परीवर्तन सेनेच्या बैठकीत गावात ‘१००% परिवर्तन’चा नारा.

मळगावात ग्रामविकास परीवर्तन सेनेच्या बैठकीत गावात ‘१००% परिवर्तन’चा नारा.


मळगाव | प्रतिनिधी : मळगाव ग्रामविकास परीवर्तन सेनेची बैठक, २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी खानोलकर हॉल येथे संपन्न झाली. या बैठकीला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि 'गावाच्या विकासासाठी एकजुटीचा निर्धार व्यक्त झाला आहे,' अशी माहिती मिळत आहे.

Article image


बैठकीदरम्यान गावातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज समस्या, घरपट्टी तसेच विद्यमान ग्रामपंचायत कार्यप्रणालि आणि कर्मचाऱ्यांच्या पगार, विद्यमान कार्यकारिणीच्या कारभार याबाबत 'विशेष' चर्चा झाली. 


यावेळी ग्रामविकास परीवर्तन सेनाच्या कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठामपणे भूमिका घेण्याचा संकल्प व्यक्त केला. 'गावात १००% परिवर्तन घडवून आणूच' अशा घोषणा देण्यात आल्या.


बैठकीस ग्रामविकास परीवर्तन सेना निमंत्रक पांडुरंग राऊळ, महेश खानोलकर, राजन पटेकर, गुरुनाथ गावकर, विलास मळगावकर, बाप्पा नाटेकर, नितेश तेली, सिद्धेश आजगावकर, प्रसाद गावकर, शेखर राऊळ, मनोज राऊळ, अशोक गावकर, निखिल पुळास्कर, अनिकेत राऊळ, लवू राऊळ यांच्यासह गावातील अनेक युवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


या बैठकीतून ग्रामविकास परीवर्तन सेनेने मळगावातील विकासाच्या नव्या पर्वाची सुरूवात केल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे असे समजते आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स