पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश..!
पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश..!
कोकिसरे बांधवाडी, गडमठ, लोरे नं. २, नापणे परिसरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात.
वैभववाडी | ब्यूरो न्यूज : कोकिसरे बांधवाडी, गडमठ, लोरे नं. २, नापणे परिसरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रविष्ट झाले आहेत. कोकिसरे माजी सरपंच राजाराम गडकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजपत दाखल झाले असल्याचे समजते आहे.
नापणे येथील तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य पांडुरंग पाटील, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनीही भाजपात प्रवेश केला आहे.
यावेळी माजी शाखाप्रमुख विलास कदम, माजी शाखाप्रमुख विजय मसुरकर, युवासेना प्रमुख नागेश आडके, राजाराम आडके, जयेंद्र कुळी, तुषार घाडी, दीपक कदम, नितीन सावंत, जयवंत साटम, सत्यवान साटम, देविदास नार्वेकर, विजय कदम, संतोष कदम, राजेंद्र आडके, संदीप आडके, गणेश आडके, सदानंद साटम, शंकर कदम, दिनकर कदम, अंकुश लाड, दत्ताराम कुळी, राजाराम गडकर, प्रकाश आमरसकर, प्रकाश विटेकर, प्रकाश पर्वते, चंद्रकांत गवाळे तसेच लोरे नं. २ येथील बुथ प्रमुख श्री. नारायण, तसेच नापणे येथील तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य पांडुरंग पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे बँक संचालक दिलीप राणे, माजी सभापती बंड्या मांजरेकर, मंगेश लोके, किशोर कांबळे, बंटी रावराणे, उमेश पवार, आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)