ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची तारकर्ली पर्यटन व्यावसायिकांसह बैठक.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची तारकर्ली पर्यटन व्यावसायिकांसह बैठक.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची तारकर्ली पर्यटन व्यावसायिकांसह बैठक. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील तारकर्ली किनारपट्टीवर दिवाळी सुट्टीमुळे पर्यटकांची वाढलेली गर्दी आणि संभाव्य अपघातांची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी तारकर्ली येथील पर्यटन व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.


समुद्रस्नानासाठी उतरलेल्या पर्यटकांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू होण्याच्या घटना टाळण्यासाठी पर्यटन व्यावसायिकांनी किनारपट्टीवर प्रशिक्षित जीवरक्षकांची नियुक्ती करावी, असे स्पष्ट निर्देश निरीक्षक जगताप यांनी दिले आहेत. हे क्षेत्र अपघात प्रवण क्षेत्र असल्याने येथे पर्यटकांना जाण्यास मनाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे असे समजते आहे.


तारकर्ली मार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असल्याने व्यावसायिकांनी पर्यटकांना चुकीच्या पद्धतीने वाहने उभी न करण्याच्या सूचना द्याव्यात. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. वाहतुकीचे नियम पाळून सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


सध्या पर्यटन हंगाम सुरू असला तरी समुद्रात वादळ सदृश परिस्थिती असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आवश्यक खबरदारी घेण्यासाठी पोलिसांनी केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन श्री. जगताप यांनी यावेळी केले.


या बैठकीला पोलीस कर्मचारी सुशांत पवार, सरपंच मृणाली मयेकर, वैभव सावंत, प्रतीक कुबल, एमटीडीसी व्यवस्थापक सिद्धेश चव्हाण यांसह पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स