ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
वन्य हत्ती बाबत वनविभागाचा नागरिकांना विशेष इशारा.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

वन्य हत्ती बाबत वनविभागाचा नागरिकांना विशेष इशारा.

प्रकाशन: 24 Oct 2025 07:18 PM
वाचन संख्या 299

वन्य हत्ती बाबत वनविभागाचा नागरिकांना विशेष इशारा.



सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : दोडामार्ग तालुक्यातील गावांमध्ये फिरत असलेल्या सहा वन्य हत्तींपैकी पाच हत्ती हे मागील आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात स्थलांतरित झाले असून, एक हत्ती दिनांक २७ सप्टेंबर २०२५ पासून सावंतवाडी तालुक्यात दाखल झाला आहे. सध्या या वन्यहत्तीचा वावर कास, सातोसे, मडुरा आणि रोणापाल या गावांमध्ये सुरू आहे.


वनविभागाकडून हत्तीवर सतत लक्ष ठेवण्यासाठी २० ते २५ कर्मचारी दिवसरात्र पाळत ठेवत आहेत. नागरिक, शेतकरी आणि त्यांच्या शेती व बागायतीचे नुकसान टाळण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या शेती व फळबागांच्या पंचनाम्यासह नुकसान भरपाईच्या प्रक्रिया जलद गतीने सुरू आहेत.


याबाबत वनविभागाच्या विशेष आवाहनात सांगितले आहे की, हत्ती प्रवण क्षेत्रातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी वन्यहत्ती पाहण्यासाठी गर्दी करू नये, तसेच फोटो, व्हिडीओ किंवा रिल्स तयार करण्यासारखी धोकादायक कृती करू नये. कार्यरत वनकर्मचाऱ्यांना सहकार्य करावे आणि त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे तसेच वन्यहत्ती दिसल्यास नजिकच्या वनाधिकारी, वनकर्मचारी किंवा नियंत्रण कक्ष (दूरध्वनी क्रमांक – 02363-272005) येथे तात्काळ संपर्क साधावा

 अशी माहिती मिळत आहे.


नागरिकांनी सुरक्षित अंतर राखून वनविभागाच्या सूचनांचे पालन केल्यास संभाव्य धोका टाळता येईल, असे आवाहन वनविभाग, सिंधुदुर्ग यांच्यावतीने करण्यात आले आहे. 


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स