समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेसाठी नोडल अधिकारी नियुक्त.
समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेसाठी नोडल अधिकारी नियुक्त.
गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांचे अभियान यशस्वितेचे आवाहन.
मालवण | ब्यूरो न्यूज : राष्ट्रीय किनारा अभियान अंतर्गत समुद्र किनारा स्वच्छता मोहीम (आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिन) २० सप्टेंबर रोजी सुनियोजितरित्या व यशस्वीरित्या करण्यासाठी मालवण गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांनी तालुकास्तरावरुन ग्रा. पं. येथे नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत.
यामध्ये वायंगणीसाठी राजेंद्र रणसिंग, तोंडवळीसाठी सुधीर गायकवाड, रेवंडीसाठी सुरज बांगर, मिर्याबांदासाठी विनायक जाधव, कोळंबसाठी श्रीकृष्ण सावंत, वायरी भूतनाथसाठी सुनील चव्हाण, तारकर्लीसाठी उदय दिक्षीत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी समन्वय साधून २० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता उपस्थित राहून समुद्र स्वच्छता अभियान यशस्वी करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांनी केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
आपापल्या 'कालिंदीं'साठीच्या प्रदूषणरूपी कालियाच्या पाच फण्यांची ओळख ....!
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची तारकर्ली पर्यटन व्यावसायिकांसह बैठक.
व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम कडून 'छापील वृत्तपत्र खरेदीवरील निर्बंधाचा निर्णय' तातडीने मागे घ्यायची शासनाकडे मागणी.