विनर्स स्पोर्टस् ॲकॅडमी येथे क्रिकेटच्या दिवाळी प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ.
विनर्स स्पोर्टस् ॲकॅडमी येथे क्रिकेटच्या दिवाळी प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ.
सिंधुदुर्ग जिल्हा लिजंडस क्रिकेट समूहाचे अध्यक्ष दीपक भोजने यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन.
ज्येष्ठ उद्योजक राजन परुळेकर, सिंधुदुर्ग जिल्हा लिजंडस क्रिकेट समूहाचे संस्थापक वासुदेव वरावडेकर, तालुका अध्यक्ष सुशील शेडगे, तालुका उपाध्यक्ष महेश तारी आदी मान्यवर तसेच विनर्स स्पोर्टस् ॲकॅडमीचे प्रशिक्षक संदीप पेडणेकर व ज्ञानेश केळुसकर उपस्थित.
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या विनर्स स्पोर्टस् ॲकॅडमीच्या दिवाळी क्रिकेट प्रशिक्षणाचे उद्घाटन २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा लिजंडस क्रिकेट समूहाचे अध्यक्ष दीपक भोजने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या प्रशिक्षण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक राजन परुळेकर यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा लिजंडस क्रिकेट समूहाच्या वतीने संस्थापक वासुदेव वरावडेकर, लिजंडसचे मालवण तालुका अध्यक्ष सुशील शेडगे, तालुका उपाध्यक्ष महेश तारी तसेच विनर्स स्पोर्टस् ॲकॅडमीचे प्रशिक्षक संदीप पेडणेकर व ज्ञानेश केळुसकर, सुमन पेडणेकर आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
विनर्स स्पोर्टस् ॲकॅडमीच्या वतीने उपस्थित मान्यवरांना शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा लिजंडस क्रिकेट समूहाचे अध्यक्ष दीपक भोजने, संस्थापक वासुदेव वरावडेकर आणि तालुका अध्यक्ष सुशील शेडगे यांनी प्रशिक्षणार्थींसाठी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले आणि प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सिंधुदुर्ग लिजंडस क्रिकेट समूहाच्या वतीने विनर्स स्पोर्टस् ॲकॅडमीला 'लेदरबाॅल क्रिकेट बॅट' देण्यात आली.
***************************************
दरम्यान, प्रशिक्षणार्थी मुलांच्या वतीने विनर्स स्पोर्टस् ॲकॅडमीचे प्रशिक्षक संदीप पेडणेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि मान्यवरांसह उपस्थितांनी त्यांना सदिच्छा दिल्या.
यावेळी सानिका मेस्त्री, धनश्री मेस्त्री, रिया गावडे, गार्गी जुवेकर, चैतन्य सावंत, क्रिश देसुरकर, सिद्धेश मायबा, लील फर्नांडिस, यश वाघ, यशवंत परब, भुवन सारंग, वैभव पवार, वृषभ परब, यज्ञेश मायबा, कु. चिन्मयी परुळेकर उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
विरण येथे संपन्न क्रिकेट स्पर्धेचे ज्येष्ठ उद्योजक अनिल कांदळकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन.
विरण येथे संपन्न क्रिकेट स्पर्धेचे ज्येष्ठ उ...
मालवणात स्वर्गीय राजनभाई आंगणे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे दुसरे पर्व सुरू.
मालवणात स्वर्गीय राजनभाई आंगणे स्मृती चषक क्...
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.