ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
माऊली महिला मंडळ शिरोडा संचलित कर्णबधिर व मतिमंद निवासी विद्यालयात पिकल बाॅल खेळाचे प्रशिक्षण.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

माऊली महिला मंडळ शिरोडा संचलित कर्णबधिर व मतिमंद निवासी विद्यालयात पिकल बाॅल खेळाचे प्रशिक्षण.

माऊली महिला मंडळ शिरोडा संचलित कर्णबधिर व मतिमंद निवासी विद्यालयात पिकल बाॅल खेळाचे प्रशिक्षण.


उद्योजक व पिकल बाॅल प्रशिक्षक सौ. वैदेही गुप्ते यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या क्रीडा उपक्रमाची होत आहे प्रशंसा. 

Article image



सिंधुदुर्ग : मुंबईतील नोवा क्यूरो नॅचरल्स कंपनीच्या प्रवर्तक आणि जनुकीय संशोधक व पोषण तज्ञ सौ. वैदेही गुप्ते ह्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात पिकल बाॅलचा प्रसार व्हावा अशी आत्यंतिक इच्छा होती. यासाठी त्यांना श्री. अरविंद प्रभू, श्री. चेतन सनिल तसंच सावंतवाडी संस्थानचे युवराज श्री. लखमराजे भोसले यांचा प्रोत्साहक पुढाकार देखिल लाभत आहे.

Article image



या दरम्यान वैदेही गुप्ते यांचा संपर्क, सावंतवाडी तालुक्यातल्या आरोस, दांडेली येथील माऊली महिला मंडळ शिरोडा संचलित माऊली कर्णबधिर व मतिमंद निवासी विद्यालय प्रशालेच्या संस्थापक अध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेविका रेखाताई गायकवाड यांच्याशी झाला. सौ. वैदेही ह्यांनी तिथल्या कर्णबधिर व मतिमंद मुलांना पिकल बाॅलचे रितसर प्रशिक्षण आणि पिकल बाॅल च्या जगाची ओळख करुन द्यायचा निर्णय घेतला. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी मुलांना वैदेही गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पिकल बाॅल खेळाच्या प्रशिक्षणाचा श्रीगणेशा करण्यात आला. इथल्या मुलांसाठी सौ. वैदेही गुप्ते यांनी प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक व सहकारी कर्मचारी यांच्या सहयोगाने एक विशिष्ट प्रशिक्षण पद्धती आखलेली आहे. जिल्ह्यात इतरत्रही 'पिकल बाॅल' चा मानस यावेळी सौ. वैदेही गुप्ते यांनी व्यक्त केला आणि या खेळातून रोजगार निर्मिती बद्दलही विशेष माहिती दिली.

Article image


यावेळी सौ. वैदेही गुप्ते यांच्या सह माऊली महिला मंडळ शिरोडा संचलित माऊली कर्णबधिर व मतिमंद निवासी विद्यालय संस्थापक अध्यक्ष रेखाताई गायकवाड, प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सहकारी आणि हीतचिंतक उपस्थित होते. 


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स