ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत 9जय गणेश इंग्लिश मिडियम स्कूलचे यश.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत 9जय गणेश इंग्लिश मिडियम स्कूलचे यश.

प्रकाशन: 19 Oct 2025 09:16 PM
वाचन संख्या 105

जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत जय गणेश इंग्लिश मिडियम स्कूलचे यश. 


मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत जय गणेश इंग्लिश मिडियम स्कूल, मालवणने यश मिळवले. या स्पर्धेत प्रथम आलेल्या सर्व संघांची सातारा येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरतून कौतुक केले जात आहे.

Article image


सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा १६ ऑक्टोबर २०२५ रोजी अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे घेण्यात आली होती. या स्पर्धेत जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलने १४ वर्ष मुलगे, १४ वर्ष मुली आणि १७ वर्ष मुली या गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच १७ वर्ष मुलगे या गटात द्वितीय क्रमांक मिळविला. स्पर्धेत प्रथम आलेल्या सर्व संघांची सातारा येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


प्रशालेच्या विजेत्या संघामध्ये सहभागी खेळाडूंमध्ये १४ वर्ष मुलगे अर्णव हडकर, यश आंबेरकर, भगवान धुरी, रुद्र कांबळी, हर्ष खराडे, सोहम कुमावत, मयंक मयेकर, मंथन दळवी, प्रणव गवंडी, निल धुरी, चिन्मय शेट्ये व राजहंस जाधव यांचा समावेश आहे. 


१४ वर्ष मुलींमध्ये केतकी गांवकर, मेघना अर्लागड्डा वैष्णव, पूर्वा खवणेकर, उर्वी गोलतकर, आरुषी देशमुख, रचिता मसुरकर, मधुर्या अर्लागड्डा वैष्णव, तनिष्का गिरकर, गार्गी मेस्त्री व श्रुती गवस, १७ वर्ष मुली गटात अनन्या नाईक, श्रीया मयेकर, आस्त्रा शेख, सारा शारबिद्रे, सानिका साळगावकर, वेदा पाताडे, भक्ती दामले, प्रतिक्षा वर्दम, दिया पराडकर, चाहूल पाटकर, आर्या जानकर व रिया फाटक हे विद्यार्थी सहभागी झाले होते. 


सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री. पंकज राणे, श्री. निशाकांत पराडकर व बास्केटबॉल प्रशिक्षक श्री. दिनेश चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या संघाचे मालवण एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. वेंगुर्लेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स