ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
सिंधुदुर्ग पोलीस दल आणि मालवण पोलीस ठाणे कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत 'सिंधुदुर्ग पोलीस - संवादातून आधार' कार्यक्रम संपन्न.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सिंधुदुर्ग पोलीस दल आणि मालवण पोलीस ठाणे कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत 'सिंधुदुर्ग पोलीस - संवादातून आधार' कार्यक्रम संपन्न.

प्रकाशन: 19 Oct 2025 09:07 PM
वाचन संख्या 105

सिंधुदुर्ग पोलीस दल आणि मालवण पोलीस ठाणे कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत 'सिंधुदुर्ग पोलीस - संवादातून आधार' कार्यक्रम संपन्न. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या संकल्पनेतून यंदाची दिवाळी ही ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरी व्हावी या उद्देशाने तसेच समाजात घडत असलेल्या सायबर क्राईम, सायबर बँकिंग फसवणूक, विविध जाहिराती द्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत सिंधुदुर्ग पोलीस दल आणि मालवण पोलीस ठाणे कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत 'सिंधुदुर्ग पोलीस - संवादातून आधार' या कार्यक्रमाचे कोळंब समर्थ मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते.

Article image


आजच्या सोशल मीडियाच्या युगात मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम तसेच ऑनलाईन बँकिंग फसवणूक सारखे गुन्हे वाढले आहेत. बहुतांशी ज्येष्ठ नागरीकांची मोठ्या प्रमाणात सायबर बँकिंग फसवणूक होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे सोशल मीडिया फ्रॉडमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी फसू नये, फ्रॉड कॉल, सोशल फ्रॉड जाहिरात यांच्या फसवणुकीपासून सावधान राहावे. ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन क्रमांक ७०३६६०६०६० या क्रमांकावर संपर्क साधून आपल्या समस्या मांडव्यात. ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी सिंधुदुर्ग पोलिस, मालवण पोलिस सदैव तत्पर आहेत, असे प्रतिपादन मालवण पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांनी केले.



यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक मारुती जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत पवार, ग्रामीण रुग्णालय मालवण डॉ. प्रतीक कदम, कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रवींद्र वराडकर, सायबर पोलीस स्टेशन सिंधुदुर्गच्या धनश्री परब, निकिता परब, पोलीस पाटील संतोष जामसंडेकर व अन्य उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गणेश माने यांनी केले. यावेळी सिंधुदुर्ग पोलिस सायबर सेलच्या धनश्री परब यांनी सायबर गुन्हे विषयक मार्गदर्शन केले. सायबर गुन्हा कसा घडला जातो. त्यापासून आपण कसे वाचले पाहिजे, आपल्या सोबत फ्रॉड कॉल वरून आर्थिकहानी होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी. फसवणूक झाली तर सायबर ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार करण्यासाठी १९३० आणि १९४५ वर तक्रार कशी करावी, तसेच सिंधुदुर्ग पोलीस या वेबसाईटवर ई तक्रार कशी करावी याबाबत सखोल माहिती उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना दिली. वधू वर सूचक मेळावे कॉल, विविध ऑफर फ्रॉड जाहिरात, सायबर क्राईम सारख्या गुन्ह्यात ज्येष्ठ नागरिकांनी फसू नये असे आवाहनही करण्यात आले.


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत पवार यांनी आरोग्य विषयी माहिती ज्येष्ठ नागरिकांना दिली. उत्तम आहार दिनचर्या, व्यायाम, पायी चालणे, सामाजिक कार्यात सहभागी व्हा मित्र जमवा, नियमित आरोग्य तपसण्या करून घ्या, नैराश्य दूर ठेऊन नेहमी आनंदी जीवन जगा, असे आवाहन केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले तर आभार सुशांत पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुक्यातील पोलिस पाटील, पोलिस कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


बहुतांशी ज्येष्ठ नागरिकांची मुले कामा निमित्त मुंबई, पुणे व अन्य शहरात अथवा परदेशात असतात. अशावेळी घरी ज्येष्ठ नागरिकाना एकट्याने दिवाळी सण साजरा करावा लागतो. हा एकटेपणा जेष्ठ नागरिकांच्या मनात वाटू नये यासाठी त्यांना या कार्यक्रमात वेगळा आनंद मिळून दिवाळी साजरी केल्याचे समाधान मिळेल. हा मुख्य उद्देश या कार्यक्रमाचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक आणि महिला ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स