ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
व्हाॅईस ऑफ मिडिया सिंधुदुर्ग आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेकडून पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

व्हाॅईस ऑफ मिडिया सिंधुदुर्ग आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेकडून पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

व्हाॅईस ऑफ मिडिया सिंधुदुर्ग आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेकडून पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.



सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सावंतवाडी येथे, 'व्हॉईस ऑफ मीडिया' सिंधुदुर्ग आणि 'कोकण कला व शिक्षण विकास संस्था' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकारांच्या पाल्यांसाठी, १८ ऑक्टोबर रोजी आयोजित शैक्षणिक किट वाटप कार्यक्रम संपन्न झाला. सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या हस्ते ह्यांच्या हस्ते या समारंभाचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष तथा युवा नेते विक्रांत सावंत, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे उपक्रमशील अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांबुरे, सकल मराठा समाज जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे तसेच कोकण व कला व शिक्षण विकास संस्थेचे प्रतिनिधी प्रथमेश सावंत आदि उपस्थित होते.

Article image


        


मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग टीमच्या वतीने मान्यवर तसेच अतिथींचे शाल, सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.


दरम्यान यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी त्यांच्या मनोगतात व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या पत्रकारितेच्या दर्जाची प्रशंसा केली व अभिनंदन केले.

यावेळी उपस्थित डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे, एडवोकेटॲड. सिद्धार्थ भांबुरे व कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते विक्रांत सावंत यांनी त्यांचे आपली मनोगते व्यक्त केली.


ह्या कार्यक्रमात नुकताच विद्यावाचस्पती अर्थातच पीएचडी मिळविलेल्या डॉ. भक्ती गांवस - तावडे, रील स्टार साईश सीताराम गावडे, महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या सौ. चैताली नयनेश गावडे आणि दहावी परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकाचे उत्तीर्ण झालेल्या रेश्मा संदेश पालव यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


दरम्यान मान्यवरांच्या हस्ते पत्रकार बांधवांच्या पाल्यांना शैक्षणिक किट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील यांनी केले तर बहारदार सूत्रसंचालन युवा आदर्श पत्रकार विनायक गांवस यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपाला संघटनेचे कार्याध्यक्ष भूषण सावंत यांनी आभार प्रदर्शन केले.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव श्री. शैलेश मयेकर, सहसचिव श्री. संजय पिळणकर, कार्याध्यक्ष श्री. आनंद धोंड, भूषण सावंत, उपाध्यक्ष श्री. अमित पालव, श्री. मिलिंद धुरी, खजिनदार श्री. आनंद कांडरकर, प्रसिद्धीप्रमुख दीपक पटेकर, महिला जिल्हाध्यक्षा पूनम राठोड, संघटक समीर म्हाडेश्वर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिद्धेश सावंत, दोडामार्ग तालुकाध्यक्ष आप्पा राणे, सदस्य नयनेश गावडे, साबाजी परब, शुभम सावंत, पत्रकार नाना धोंड, अक्षय धुरी, नितिन गावडे यांसह व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे पदाधिकारी यांनी योगदान दिले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स