शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची वाळू व डंपर व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची वाळू व डंपर व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट.
मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची, मालवण तालुक्यातील वाळू व डंपर व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट घेतली.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी वाळू व्यवसाय व डंपर व्यावसायिकांचे प्रश्न जाणून घेत सांगितले की आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हे प्रश्न निश्चित सोडवले जातील.
सदर शिष्यमंडळाच्या वतीने त्यांच्या व्यवसायातील अडचणी, रखडलेली वाळू टेंडर प्रक्रिया तथा निविदा प्रक्रिया गतिमान होण्यासाठी प्रशासनाकडून न मिळणारे सहकार्य अशा मुद्द्यांवर जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडे भूमिका मांडण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यवसायिकांचे म्हणणे ऐकून घेत आमदार निलेश राणे यांच्याशी संपर्क साधला व व्यवसायिकांच्या असलेल्या समस्या त्यांच्याकडे पोहोचवल्या आहेत. दरम्यान आमदार निलेश राणे यांनी व्यावसायिकांचे जे काही प्रश्न असतील, प्रशासन स्तरावर ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याची ग्वाही दिली आहे. आमदार निलेश राणे यांच्या मालवण दौऱ्यात भेट घेऊन याबाबत निवेदन दिले जाईल अशी माहिती संजय वराडकर यांनी दिली. यावेळी शिवसेना मालवण शहर संघटक राजू बिडये यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संजय वराडकर, प्रणय कांबळी, मंदार कांदळकर, कौशल गवंडी, शुभम रेवंडकर, बंटी पेडणेकर, समीर मेथर, स्वप्नील सावंत, रोहन मयेकर, अमित कांबळी, प्रसाद परुळेकर, अमोल चव्हाण, आप्पा चव्हाण, शेखर वाक्कर, सागर भोगवेकर, शाम वाक्कर, बंटी चव्हाण, बाबू चव्हाण, संतोष सातार्डेकर, सुयश गावडे, राहुल गोलतकर, स्वप्नील देऊलकर, यश सक्नु, केदार कवटकर, ऋषी आसोलकर, सुशील शेडगे, सचिन मराठे, सिद्धेश परब, ओम कांबळी, सुयश गावकर, हेमंत चव्हाण, राजा सावंत, प्रशांत परब आदी वाळू व डंपर व्यावसायिक उपस्थित होते अशी माहिती मिळत आहे.
सौजन्य | मालवण ब्यूरो
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...