सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून उद्योगिनी उपक्रमा अंतर्गत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध उत्पादनांचे प्रशिक्षण सत्र.
सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून उद्योगिनी उपक्रमा अंतर्गत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध उत्पादनांचे प्रशिक्षण सत्र.
उद्योगिनीच्या चेअरमन सौ. पल्लवी गुंजाळ व मान्यवर उपस्थित.
कोल्हापूर | ब्यूरो न्यूज : सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, कोल्हापूर रिजन अंतर्गत 'उद्योगिनी' या महिलांसाठी असलेल्या उपक्रमाच्या सभे दरम्यान श्री. चक्रधर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली घराघरात वापरले जाणारे सुगंधित उटणे,अभ्यंग तेल व शुद्ध शाकाहारी आयुर्वेदिक साबण यांचे प्रात्यक्षिकांसहित प्रशिक्षण सत्र संपन्न झाले. यावेळी उद्योगिनी चेअरमन सौ. पल्लवी गुंजाळ व मान्यवर उपस्थित होते.
१३ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न झालेल्या ह्या उपक्रमाद्वारे, प्रशिक्षण दिलेली सर्व उत्पादने तथा वस्तू दिवाळी सणासोबतच, त्यात थोडे फार कालानुरूप व सणानुरूप बदल करून ते बारमाही व्यवसायाचे साधन ठरू शकतात अशी माहिती मिळत आहे.
या कार्यशाळेसाठी तेल व उटणे यांना लागणारा कच्चा माल लक्ष्मी आयुर्वेदिकच्या सर्वेसर्वा तसेच 'उद्योगिनी' च्या सचिव सौ. सोनाली जामसंडेकर मॅडम यांनी अर्ध्या किमतीत दिल्याची माहिती चेअरमन सौ. पल्लवी गुंजाळ यांनी डिजीटल सामाजिक मंचावरून दिली आहे.
उद्योगिनी चेअरमन सौ. पल्लवी गुंजाळ, सचिव सौ. सोनाली जामसंडेकर, समन्वयक सौ. सोनाली गायकवाड यांनी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सहकार्य व योगदान दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
पनवेल येथील अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाच्या चिंतन शिबीरात महासंघ अध्यक्ष तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांचे मार्गदर्शनपर संबोधन.
पनवेल येथील अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाच्...
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांची सामाजिक कार्यकर्ते तथा कणकवलीचे ज्येष्ठ व्यापारी राजेंद्र पेडणेकर व संजय मालंडकर यांनी घेतली भेट.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांची सामाजिक क...
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये 'मार्केट डे' उत्साहात.
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये 'मार्केट ...
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप नगराध्यक्ष सुशांत नाईक यांना अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतच्या मालकीच्या जागेतील जेष्ठ व्यापारी तसेच व्यावसायिकांची भेट आणि निवेदन.
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप...