शहर विकासाच्या संकल्पना विषयावर वेंगुर्ले येथे १९ ऑक्टोबर रोजी चर्चासत्र.
शहर विकासाच्या संकल्पना विषयावर वेंगुर्ले येथे १९ ऑक्टोबर रोजी चर्चासत्र.
सामाजिक कार्यकर्ते व वेंगुर्ला शहर नागरी कृती समितीचे निमंत्रक ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांची माहिती.
वेंगुर्ले | ब्यूरो न्यूज : वेंगुर्ले शहर नागरी कृती समिती या अराजकीय संस्थेच्या पुढाकाराने व शहरातील सर्व नागरिकांच्या सहकार्याने शहर विकासाच्या संकल्पना' या विषयावर रविवार १९ रोजी दुपारी ठीक ३ ते ५ यावेळेत नगर वाचनालय, वेंगुर्ले येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते तसेच वेंगुर्ला शहर नागरी कृती समितीचे निमंत्रक ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.
सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून वेंगुर्ले शहर पुढील ५ वर्षात म्हणजे २०३१ पर्यंत कसे असावे यावर शहरातील कोणताही नागरिक आणि जागरूक मतदार स्वतःची परखड मते व्यासपीठावर खुलेपणाने व्यक्त करू शकतो. प्रत्येक सहभागी व्यक्तीला ३ मिनिटाचा वेळ निश्चित करण्यात आला असून रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत स्वतःची नावनोंदणी 9422434356, 9423301354, 9921530274 या नंबरवर करावी तसेच उपक्रमात प्रथम २५ नोंदणी केलेल्या नागरिकांना व्यक्त होण्याची संधी मिळणार असून यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही अशी माहिती मिळत आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, इच्छुक उमेदवारांना स्वतःचे व्हिजन मांडण्याची सुसंधी या उपक्रमामुळे प्राप्त झाली आहे. वेंगुर्ले शहरातील सुजाण, सतर्क, जागरूक, बुद्धिजीवी आणि सुशिक्षित नागरिक तथा मतदारांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन वेंगुर्ले शहर नागरी कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे अशी माहिती ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...