शिवसेना मालवण तालुका सरचिटणीस पदी श्री. चंद्रकांत गोलतकर.
शिवसेना मालवण तालुका सरचिटणीस पदी श्री. चंद्रकांत गोलतकर.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र.
ब्यूरो न्यूज | आचरा : मालवण तालुक्यातील पळसंब गावचे माजी सरपंच तथा शिवसेना पदाधिकारी श्री. चंद्रकांत गोलतकर यांची, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना मालवण सरचिटणीसपदी पदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते त्यांना तसे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
त्यावेळी जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, उपजिल्हा प्रमुख महेश राणे, तालुका प्रमुख विनायक बाईत, विभाग प्रमुख संतोष कोदे उपविभाग प्रमुख, भाऊ हडकर, आचरा सरपंच जेराॅन फर्नाडिस उपसरपंच संतोष मिराशी, बाबू परुळेकर, बाबु कदम ग्रा. पं. सदस्य चंदु कदम, चावल मुजावर, रुपेश हडकर, अभय हडकर, सचिन हडकर, पंकज आचरेकर, अभि सावंत, उदय घाडी, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती मिळत आहे.
आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली अपेक्षित कार्य करत रहायची प्रतिक्रिया नूतन तालुका सरचिटणीस चंद्रकांत गोलतकर यांनी दिली आहे. विविध सामाजिक माध्यमातून श्री. गोलतकर यांना शुभेच्छा दिल्या जात असून आगामी जिल्हा परीषद निवडणुका लक्षात घेता ही नियुक्ती म्हणजे महत्वाची जबाबदारी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...