कांदळगाव येथे शैक्षणिक साहित्य वाटप.
कांदळगाव येथे शैक्षणिक साहित्य वाटप.
सरपंच रणजीत परब यांच्या तर्फे वाढदिवसा निमित्त विशेष उपक्रमाचे दहावे वर्ष.
मसुरे | प्रतिनिधी : कांदळगावचे सरपंच रणजित परब यांनी वाढदिवसानिमित्त कांदळगाव येथील शाळा नं. १ व शाळा नं. २ व दोन्ही अंगणवाडीच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. गेली दहा वर्षे शाळेतील मुलांसोबत शैक्षणिक साहित्य वाटप करत ते त्यांचा वाढदिवस साजरा करतात.
यावेळी उपसरपंच राजेंद्र कदम, मुख्याध्यापिका संध्या मेथर, सहाय्यक शिक्षिका सौ. ज्योती कर्णे, शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष अनुष्का मेस्त्री, पोलीस पाटील अक्षिता राणे, श्रीराम परब, महेश परुळेकर, जीवन कांदळगावकर, राजन मेस्त्री, मिलिंद परब, अमित राणे, सौ. साटम व विद्यार्थी उपस्थित होते. प्रशालेच्या वतीने सरपंच रणजित परब यांच्या या शैक्षणिक मदतीबद्दल आभार मानण्यात आले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा.
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्...
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.