ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरामवाडी, नांदोस, वराड येथील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना पक्षप्रवेश.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरामवाडी, नांदोस, वराड येथील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना पक्षप्रवेश.

प्रकाशन: 12 Oct 2025 07:12 AM
वाचन संख्या 142

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरामवाडी, नांदोस, वराड येथील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना पक्षप्रवेश.

Article image


जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले सर्वांचे पक्षात स्वागत.


मालवण | ब्यूरो न्यूज : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत, गुरामवाडी येथील जिल्हापरिषद माजी सभापती बाळ महाभोज यांच्यासह गुरामवाडी, नांदोस, वराड येथील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले.


आमदार निलेश राणे यांनी गेल्या दहा महिन्यात विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन व गांव विकासाचा दृष्टिकोन ठेवून शिवसेनेत पक्ष करत असल्याची प्रतिक्रिया प्रवेशकर्त्यांनी दिल्याचे समजते. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हे सातत्याने गावागावातील जनतेच्या संपर्कात असणारे नेतृत्व आहे. त्यांच्याकडे प्रश्न मांडला की तो प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लागतो. विकासकामे पुर्ण होतात. याच कार्य पद्धतीवर प्रेरित होऊन पक्ष प्रवेश करतं असल्याचे प्रवेशकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. 


यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, जि. प माजी सभापती संतोष साटविलकर, शहरप्रमुख दिपक पाटकर, गुरामवाडी सरपंच शेखर पेणकर, पेंडूर जिप विभाग प्रमुख राजन माणगांवकर, वराड शिवसेना गांवप्रमुख बबन पांचाळ, शिवसेना सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, संतोष पालव, महेश बागवे, सुशांत घाडीगावकर, दिलीप बिरमोळे, वायरी विभागप्रमुख मंदार लुडबे, शानू वालावलकर यांसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. 


शिवसेनेत प्रवेशकर्त्यांमध्ये, कट्टा गुरामवाडी येथील जिल्हापरिषद माजी सभापती बाळ महाभोज, राजेंद्र कांबळी, प्रमोद कांबळी, राधाकृष्ण महाभोज, बाबू मालवणकर, दिपक गुराम, साबाजी गुराम, अक्षय गुराम, ओंकार लाड, नांदोस गडकरवाडी उबाठा माजी शाखा प्रमुख सुभाष ठोंबरे, चंद्रकांत कोंडसकर, सुभाष घावरे, विनोद पार्टे, संजय मिठबावकर, प्रकाश खोत, मुकुंद भोसले, तेजस हरचांदे, जनार्दन भोसले, शशिकांत पार्टे, अविनाश पार्टे, अरुण इंदूलकर, सुरेश इंदूलकर, वराड उबाठा शाखाप्रमुख किशोर भगत, शाखा प्रमुख आप्पा आळवे, मोहन आळवे, नितीन नाईक यांचा समावेश आहे अशी माहिती मिळत आहे.


सौजन्य | मालवण ब्यूरो 


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स