पोईप येथे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश.
पोईप येथे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश.
आमदार निलेश राणे यांचे संघटना वर्धन व विकास कार्याची जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केली विशेष प्रशंसा.
पोईप | प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत, मालवण तालुक्यातील पोईप येथे शिवसेना पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी आमदार निलेश राणे यांच्यासह जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व वरीष्ठ पदाधिकारी, नेते उपस्थित होते.
यावेळी संबोधित करताना आमदार निलेश राणे यांनी, आगामी जिल्हापरिषद पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत या निवडणूका महत्वाच्या आहेत याचे त्यांनी उपस्थित सर्वांना स्मरण करुन दिले. ते पुढे म्हणाले की, 'भगवा' गावात आणि घराघरात पोहचला पाहिजे. सर्वत्र भगवा फडकला पाहिजे. ही निवडणुक तुमच्या पुढील २५ वर्षे अस्तित्वाची आहे. त्या दृष्टीने तयारी करावी. विकास कामांची जबाबदारी आमची. तुम्ही जनतेला देणार तो विकासकामांचा शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असेही त्यांनी प्रतिपादन केले.
पोईप येथील ठाकरे युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, माजी सरपंच शिवरामपंत पालव यांसह पोईप जिप मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिप अध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, अनिल कांदळकर, राजा गावडे, दिपक नारकर, मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर, संतोष साटविलकर, राजन माणगांवकर, सरपंच श्रीधर नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवासेना तालुकाप्रमुख अभि गावडे, स्वप्नील गावडे, अनिकेत तेंडोलकर, सागर वालावलकर, सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, उपतालुका प्रमुख विजय चव्हाण, अरुण तोडणकर, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर, भाऊ चव्हाण, छोटू ठाकूर, पिंट्या गांवकर, विभागप्रमुख कमलेश प्रभू, बाबू परब, राजू बिडये, मंदार लुडबे, प्रदीप माने, पपू वराडकर, बाळा पालव, स्वरूप वाळके, राहुल बागवे यांसह अन्य पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार निलेश राणे यांनी, त्यांची दुसरी इनिंग खासदार नारायण राणे साहेब यांच्या मतदारसंघातून झाली हे देवाचे आशीर्वाद आणि जनतेचे प्रेम आहे असे विशेष नमूद केले. शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपेक्षित शिवसेना पक्ष संघटना वाढवत असताना राणे साहेबांचा मतदार संघ आणि खासदार राणे यांची माणसे जपणे हे माझे कर्तव्य आहे तसेच दहा वर्षे मागे पडलेल्या या मतदार संघाचा आणि जनतेला अपेक्षित विकास हेच माझे लक्ष आहे असे त्यांनी स्पष्ट केले. आमदार म्हणून सुमारे २००कोटी पेक्षा जास्त विकासनिधी आगामी काळात या मतदारसंघात आणणार आणा त्या सोबत जिल्हा नियोजन, राज्य सरकार, केंद्र सरकार या माध्यमातून मोठा निधी येतोय. यापुढे येत राहील अशीही त्यांनी आश्वस्तता दिली. शेकडो कोटी विकासनिधीच्या माध्यमातून गावागावात जनतेच्या मागणीनुसार विकास होईल. असे सांगत आमदार निलेश राणे यांनी मतदारसंघाच्या 'विकासाचे व्हिजन' स्पष्ट केले.
दहा महिन्यात दहा ते बारा हजार एकूण संख्येने झालेल्या शिवसेना पक्षप्रवेशबाबत, आ. निलेश राणे यांनी यासाठी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त काम जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे असून त्यांचा शब्द कधी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली.
यावेळी संबोधित करताना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले की, जे येतील त्या सर्वांचे पक्षात स्वागत असेल. सगळ्यांना एकत्र घेऊन जोमाने एकसंघ शिवसेना संघटना वाढत आहे. राणे साहेबांनी, १९९० साली शिवसेना जशी वाढवली तशी शिवसेना आमदार निलेश राणे वाढवत आहेत. विकास गतिमान आहे. ग्रामस्थ सुचवतील ती कामे मंजूर करून गांव विकासाची जबाबदारी आमची आहे. पक्ष प्रवेशांचे श्रेय आमदार निलेश राणे यांचेच आहे. त्यांच्या कार्यावर प्रेरित होऊन शिवसेना वाढत आहे. एक कुटुंब म्हणून ते सर्वाना सोबत घेऊन पुढे जात आहेत असे सांगत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांचे संघटना वर्धन व विकास कार्याची प्रशंसा केली.
यावेळी सोबत माजी जिप सभापती अनिल कांदळकर, शिवसेना शाखा प्रमुख नारायण राणे यांच्या सेवाभावी कामाचेही दत्ता सामंत यांनी विशेष कौतुक केले आणि पक्ष प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत केले.
यावेळी माजी आमदार राजन तेली यांच्यासह मान्यवरांनी उपस्थितांना विशेष संबोधित केले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते पोईप येथील प्रशालेच्या वर्ग खोल्यांचे भूमिपूजन.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते पोईप ...
विरण बाजार पेठेतील रस्त्याचे काम सुरू.
विरण बाजार पेठेतील रस्त्याचे काम सुरू.पोईप | प...
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.