कुस्तीत कुडाळ 'लाॅ कॉलेजचा' लोहा....!
कुस्तीत कुडाळ 'लाॅ कॉलेजचा' लोहा....!
मुंबई विद्यापीठ आयोजित कुस्ती स्पर्धेत व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज' कुडाळच्या अभिजीत लोखंडेला रोप्य पदक.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : मुंबई विद्यापीठ आणि सोनुभाऊ बसवंत कला व वाणिज्य महाविद्यालय, शहापूर जिल्हा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,'आंतरमहाविद्यालयीन कुस्ती' स्पर्धेत व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळच्या अभिजीत लोखंडे या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक प्राप्त करून रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेसाठी अभिजीत लोखंडे याला वाहतुक पोलीस श्री. आशिष जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
यापूर्वी लॉ कॉलेज कुडाळच्या विद्यार्थ्यांनी इतर अनेक स्पर्धांमध्ये उज्वल कामगिरी केलेली आहे पण कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारा अभिजीत लोखंडे हा लॉ कॉलेज कुडाळ चा पहिला विद्यार्थी ठरला आहे. लॉ कॉलेज कुडाळ साठी सुद्धा क्रीडा प्रकारातील हे पहिलेच बक्षीस असून त्याबद्दल लॉ कॉलेज कुडाळ चे संस्थापक श्री. व्हिक्टर डांटस, प्राचार्य डॉ. शिल्पा मर्गज तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी यांच्याकडून अभिजीत लोखंडे ह्याची प्रशंसा होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम.
कणकवली व कुडाळ येथील बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
कणकवली व कुडाळ येथील बुद्धिबळ स्पर्धेला उत्स...
जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा नेरूर शिरसोसचे शिष्यवृत्ती व जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश.
जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा नेरूर शिरसोसचे शिष्...