ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
ग्रामदैवत श्री देव नारायण आणि श्री देव रामेश्वर यांचा बलिप्रतिपदे दिवशी ( २२ ऑक्टोबर रोजी)   ऐतिहासिक पालखी सोहळा .
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

ग्रामदैवत श्री देव नारायण आणि श्री देव रामेश्वर यांचा बलिप्रतिपदे दिवशी ( २२ ऑक्टोबर रोजी) ऐतिहासिक पालखी सोहळा .

प्रकाशन: 11 Oct 2025 07:41 PM
वाचन संख्या 196


ग्रामदैवत श्री देव नारायण आणि श्री देव रामेश्वर यांचा बलिप्रतिपदे दिवशी ( २२ ऑक्टोबर रोजी) ऐतिहासिक वार्षिक पालखी सोहळा . 


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण आणि श्री देव रामेश्वर यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा बलिप्रतिपदा म्हणजे दीपावली पाडव्या निमित्त २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता सुरू होणार आहे. भाविकांनी यात मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण, श्री देवी सातेरी, देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

Article image


मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांचा वार्षिक पालखी सोहळा २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता श्री देव रामेश्वर मंदिर येथून निघून श्री देव नारायण, श्री देवी पावणाई, श्री देवी भावई, श्री देवी सातेरी या सर्व देवतांना सांगणे करून आडवणमार्गे तानाजी नाका, श्री देव भूतनाथ मंदिर येथे थांबून समुद्रमार्गे मोरेश्वर (मोरयाचा धोंडा) येथे थांबेल. त्यानंतर दांडेश्वर मंदिर येथून श्री देवी काळबादेवी मंदिर येथे थांबून जोशी मांड येथे येईल व त्यानंतर नगर वाचनालयाकडून सोमवार पेठ येथील श्री देव रामेश्वर मांड येथे भाविकांच्या दर्शनासाठी प्रतिवर्षाप्रमाणे थांबून बाजारपेठ भरडमार्गे देऊळवाडा येथे मंदिरात येईल. तरी या पालखी सोहळ्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे केले आहे अशी माहिती मिळत आहे.


पालखी सोहळ्यामुळे मालवण नगरीला जत्रेचे स्वरूप प्राप्त होत असते. दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी ग्रामदेवत रामेश्वर व नारायणाची पालखी प्रदक्षिणा तसेच रामेश्वर, नारायण आणि त्यांची बहीण काळबादेवीचा पारंपरिक भाऊबीज सोहळा साजरा होत असतो. ग्रामदेवतांची पालखी सजविण्यात येत असते. भूतनाथ येथे पालखीसोबत आलेल्या मानकरी प्रजाजनांना बोडवे - गावकर यांच्याकडून श्रीफळ भेट देऊन स्वागत करण्यात येते. दुपारी १ वाजता रामेश्वर व नारायणाचे वर्सलदार कुटुंबीय आणि गावकर मानकरी रामेश्वरा समोर श्रीफळ ठेवून गाऱ्हाणे घालतात. ढोल - ताशांच्या गजरात रामेश्वर व नारायणाची पालखी मालवणच्या परिक्रमेसाठी बाहेर पडते. प्रारंभी श्री. देव रामेश्वर मंदिराभोवती प्रदक्षिणा संपन्न केली जाते. पुण्यक्षेत्र श्री. मोरयाचा धोंडा, श्री देव दांडेश्वर, बंदर जेटीपर्यंत समुद्रकिनारी भाविकांचा प्रचंड उत्साह असतो. समुद्र किनाऱ्यावर बांबूची मंदिरे, देखावे साकारण्यात येतात. मच्छीमारांकडून श्री देव रामेश्वराचे उत्साहात स्वागत करण्यात येत असते. मोरयाचा धोंडा ते बाजारपेठ दरम्यान भाविकांची गर्दी असते. किनारपट्टी ठिकठिकाणी पताका लावून सजविण्यात येते.


यावर्षी पालखी सोहळ्याला मालवणात भाविकांची गर्दी लक्षात घेऊन देवस्थान ट्रस्टतर्फे सोहळा सुरळीत संपन्न होण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात येत आहे तर व्यापारी संघ आणि समस्त मालवण वासिय ह्यांना पारंपरिक वार्षिक सोहळ्याची सात्विक उत्कंठा लागली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...

11 Aug 2026 282

लोकप्रिय टॅग्स