आंजिवडे सिद्ध सातेरी मंदिर परिसर सुशोभीकरण साठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ५ लाख निधी मंजूर
आंजिवडे सिद्ध सातेरी मंदिर परिसर सुशोभीकरण साठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ५ लाख निधी मंजूर.
ब्यूरो न्यूज : कुडाळ तालुक्यातल्या
माणगाव खोऱ्यातील सर्वात दुर्गम व सर्वात शेवटचा गाव असलेल्या आंजीवडे गावाचे ग्रामदैवत श्री सातेरी मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा वार्षिक योजना क वर्ग अंतर्गत ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आंजीवडे गावच्या ग्रामदेवता मंदिर सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नारकर, विनायक राणे, दिलीप सावंत, यांचे कृष्णा पंधारे यांनी आंजीवडे गावाच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने महिला बाल रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ.