ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
जल व्यवस्थापनाच्या युक्तीला साथ आणि जाणीवेच्या प्रचितीचा समर्थ हात..!
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

जल व्यवस्थापनाच्या युक्तीला साथ आणि जाणीवेच्या प्रचितीचा समर्थ हात..!

प्रकाशन: 09 Oct 2025 04:01 AM
वाचन संख्या 62

जल व्यवस्थापनाच्या युक्तीला साथ आणि जाणीवेच्या प्रचितीचा समर्थ हात..!


श्री. महेश इंगळे यांचे पाणी प्रश्नी दातृत्व.


हसापूर येथे नवीन विहीर खोदाईसाठी २ गुंठे जमीन खरेदीस केली ८ लाख रुपयांची आर्थिक मदत.


अक्कलकोट | प्रतिनिधी : अक्कलकोट तालुक्यातील मौजे हसापूर येथे गेल्या अनेक वर्षापासून गावामध्ये पाणी टंचाई भासत होती. यंदाचा पावसाळा समाधानकारक होवूनही अक्कलकोट शहरासारखेच हसापूर गावातही पाणी प्रश्न कायम आहे. हसापूर मधील ही पाणी टंचाई व पाणी प्रश्न लक्षात घेऊन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा माजी नगरसेवक महेश इंगळे यांनी पुढाकार घेऊन यंदाच्या विजयादशमीच्या शुभ मुहुर्तावर नवीन विहीर खोदकामासाठी २ गुंठे जमीन घेऊन देण्यासाठी ८ लाख रुपयांची वैयक्तीकरित्या आर्थिक मदत केली, अशी माहिती मिळत आहे. 

Article image


ही आर्थिक मदत प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते जयवंत जयनंदलाल चव्हाण यांचे मातोश्री रुक्मिणीबाई जयनंदलाल चव्हाण यांना रक्कम तात्काळ सुपूर्द करण्यात आली. महेश इंगळे यांच्या स्तुत्य उपक्रमामुळे हसापूर ग्रामस्थांच्या वतीने महेश इंगळे यांच्याप्रती कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या मदतीमुळे हसापूर गावचे पाणी प्रश्न कायमचेच मार्गी लागणार आहे. महेश इंगळे यांच्या या मदतीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांच्या या मदतीबद्दल व विजयादशमी दसऱ्याचे औचित्य साधून मौजे हसापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. 


यावेळी हसापूर ग्रामपंचायत सरपंच कामाठी, उपसरपंच गौतम घटकाबळे, ग्रामपंचायत सदस्य गणेश कामाठी, मीनाबाई शिंदे, कृष्णाबाई सदाफुले, सायनत्राबाई घटकाबळे, माजी सरपंच पाटील, रामलिंगया स्वामी, शीतापती कामाठी, राजकुमार कामाठी, महेश कामाठी, रोहित जाधव आदींसह हसापूरचे ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य गणेश कामाठी यांनी केले, तर आभार उपसरपंच गौतम घटकांबळे यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स