ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
कुडाळ व मालवण तालुक्यात 'क' वर्ग पर्यटन अंतर्गत ८० लाखांचा निधी मंजूर.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

कुडाळ व मालवण तालुक्यात 'क' वर्ग पर्यटन अंतर्गत ८० लाखांचा निधी मंजूर.

प्रकाशन: 09 Oct 2025 05:15 AM
वाचन संख्या 84

कुडाळ व मालवण तालुक्यात 'क' वर्ग पर्यटन अंतर्गत ८० लाखांचा निधी मंजूर.


आमदार निलेश राणे यांचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व पदाधिकारी यांच्यावतीने आभार. 

Article image


ब्यूरो न्यूज : कुडाळ व मालवण तालुक्यातील एकूण १५ देवस्थानांच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना क वर्ग पर्यटन योजनेअंतर्गत एकूण ७५ लाखांचा निधी पहिल्या टप्यात मंजूर करण्यात आला आहे. 


यात घावनळे येथील श्री. स्वामी समर्थ मठ परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, नेरूर कविलकाटे श्री. साई मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, सोनवडे तर्फ कळसुळी श्रीकृष्ण मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, मोरे येथील श्री देवी माऊली मंदिर परिसर सुशोभीकरण करणे-५ लक्ष, श्री कलेश्वर मंदिर नेरूर येथे जलशुद्धीकरण यंत्र बसविणे- ५ लक्ष, बिबवणे श्री देव गिरोबा मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, श्री देवी सिद्ध सातेरी मंदिर आंजिवडे परिसर सुशोभीकरण करणे-५ लक्ष, श्री देव लक्ष्मी नारायण मंदिर आवळेगाव परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, पांग्रड येथील श्री देव स्वयंभु महादेव मंदिर परिसर सुशोभीकरण करणे ५ लक्ष, हळदीचे नेरूर श्री देव जटाशंकर मंदिर परिसर सुशोभीकरण करणे ५ लक्ष एवढा निधी कुडाळ तालुक्यातील मंदिर व धार्मिक तीर्थक्षेत्र परिसर विकासासाठी मंजूर करण्यात आला आहे. 


तर मालवण तालुक्यातील बुधवळे मिर्लेश्वर भगवती मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, गुरामनगरी श्री देव लिंगेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, देवली भगवती मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, नांदरुख श्री देव गिरोबा मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, श्री देव लिंगेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण करणे- ५ लक्ष, असगणी रामेश्वर पावणाई देवी मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, श्री देव जैन ब्राम्हण मांडवीर मंदिर पाणलोस येथे सुशोभिकरण करणे- ५ लक्ष या कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.


धार्मिक तीर्थक्षेत्र विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना 'क' वर्ग पर्यटन अंतर्गत एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीप्ती पडते, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवती जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख दीपक नारकर, विनायक राणे शिवसेना मालवण तालुका प्रमुख विनायक बाईत, राजा गावडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स