कुडाळ व मालवण तालुक्यात वीजवितरणचे नवीन १८ ट्रान्सफार्मर मंजूर.
कुडाळ व मालवण तालुक्यात वीजवितरणचे नवीन १८ ट्रान्सफार्मर मंजूर.
आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा वार्षिक योजनेतून निधीच्या मंजुरीची जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती.
ब्यूरो न्यूज : कुडाळ व मालवण तालुक्यासाठी एकूण १८ ट्रान्सफार्मरच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून यात डिकवल वरचीवाडी, कुणकवळे बागवाडी, गोळवण सावरवाड, आचरा हिर्लेवाडी, तळगाव शेळवणेवाडी, काळसे परबवाडी, कट्टा बाजारपेठ, कुडाळ मच्छीमार्केट, पिंगुळी गुढीपुर, मालवण धुरीवाडा, चेंदवन वेलवाडी, वालावल आर्कचापूल, शासकीय तंत्रनिकेतन, देवली वाघवणे, जांभवडे कुंभारवाडी, मांडकुली भोईवाडी, निवजे, कसाल बाजारपेठ, आंबेरी गोसावीवाडी, वेताळ बांबर्डे कदम वाडी या कमी दाबाने वीजपुरवठा होणाऱ्या भागात नवीन ट्रान्सफार्मरसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या बाबतची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली असून आमदार निलेश राणे यांच्या जवळ कुडाळ मालवण तालुक्यातील जनतेच्या मागणीनुसार हे ट्रान्सफार्मर मंजूर करण्यात आले आहेत अशी माहिती मिळत आहे.
विज यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आमदार निलेश राणे हे तत्पर असून येत्या काळात उर्वरित कामांना मंजुरी मिळणार आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
आमदार निलेश राणे यांनी 'चौकटीत राहून काॅमेडी' करायचा सांस्कृतिक जागृतीपर इशारा दिलेला होता...!
आमदार निलेश राणे यांनी 'चौकटीत राहून काॅमेडी' ...
माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.