लेखिका मेघना जोशी यांनी माजी राष्ट्रपती ए. पि. जे. अब्दुल कलामांच्या पंचसूत्रीचा वापर समजावला.
लेखिका मेघना जोशी यांनी माजी राष्ट्रपती ए. पि. जे. अब्दुल कलामांच्या पंचसूत्रीचा वापर समजावला.
वराडकर हायस्कूल कट्टा येथे 'डिजीटल युग आणि भावनीक गुंता' विषयावर विशेष व्याख्यान.
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव श्रीमती विजयश्री देसाई, शालेय समिती अध्यक्ष तथा सखी सावित्री समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर, समुपदेशक सौ. श्रद्धा नाईक, मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, सौ. वीणा शिरोडकर आदि मान्यवर उपस्थित.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींसाठी शालेय सखी सावित्री समितीच्या वतीने 'डिजिटल युग आणि भावनिक गुंता' या विषयावर लेखिका सौ. मेघना जोशी यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव श्रीमती विजयश्री देसाई, शालेय समितीचे अध्यक्ष तथा सखी सावित्री समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर, समुपदेशक सौ. श्रद्धा नाईक, मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, सौ. वीणा शिरोडकर आदी उपस्थित होते.
प्रत्येक मुलीला म्हणा अथवा स्त्रीला म्हणा परमेश्वराने सिक्स्थ सेन्स असणारी एक दैवी शक्ती प्राप्त करून दिलेली असते. स्त्रीच्या मनातील भावनिक गुंता सोडविण्यासाठी या सिक्स्थ सेन्सचा वापर होत असतो. जेव्हा मुली किंवा स्त्रिया एखाद्या समस्येत अडकत असतात तेव्हा त्यांच्यातील सिक्स्थ सेन्स हे त्यांना जाणीव करून देतात की हे करू नको किंवा हे कर. परंतु त्या सिक्स्थ सेन्सचा वापर सुयोग्य पद्धतीने झाला पाहिजे, जर तो योग्य रीतीने झाला तर आपण आयुष्याच्या पथावरून चालताना आपल जीवन सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका सौ. मेघना जोशी यांनी कट्टा येथे बोलताना केले.
यावेळी बोलताना सौ. मेघना जोशी म्हणाल्या, समाजात वाटचाल करीत असताना प्रत्येकाने सकारात्मकता पाळली पाहिजे, आपल्यामध्ये सकारात्मकता बाळगली पाहिजे, परंतु कधी कधी नकारात्मकताही जीवनात चांगले घडवते, म्हणून जीवनात नकारात्मकतेचा विचार आणताना एखाद्या गोष्टीच्या दुष्परिणामांचा विचारही केला गेला पाहिजे. जेव्हा समस्या निर्माण होतात, तेव्हा प्रत्येक व्यक्तीला अदृश्य जगात काहीतरी निर्णय घेण्याची वेळ येते, ती वेळच महत्वाची असते, आज डिजिटल युगात मुलींमधील असलेला भावनिक गुंता सोडवायचा असेल तर भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी जीवनाची जी पाच सूत्रे सांगितली आहेत त्या सूत्रांचा म्हणजेच मी हे करू शकतो, मी सर्वोत्तम आहे, मी विजेता होणार, आजचा दिवस माझा आहे, आणि परमेश्वर सतत माझ्या बरोबर आहे या पाच सूत्रांचा वापर केल्यास जीवन समृद्ध आणि सुखकारक बनेल असेही सौ. जोशी म्हणाल्या.
यावेळी मुख्याध्यापिका सौ. गावडे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. तसेच सौ. वीणा शिरोडकर यांनी आभार मानले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
शाळांच्या यंदाच्या सुट्यांच्या तारखा जाहीर ; एप्रिलअखेर वार्षिक परीक्षा.
शाळांच्या यंदाच्या सुट्यांच्या तारखा जाहीर ;...