ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कोटींचा निधी.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कोटींचा निधी.

प्रकाशन: 06 Oct 2025 06:40 PM
वाचन संख्या 150

पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कोटींचा निधी. 


खासदार नारायण राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना निधीच्या मंजुरीचे श्रेय असल्याची शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांची माहिती. 


येत्या काळात पर्यटन आणि मच्छिमार विकास क्षेत्रांमध्ये मालवणला अजून भरीव निधी मिळण्याची व्यक्त केली अपेक्षा.


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांचे योगदान आणि स्थानिक जनतेच्या पाठिंबामुळे केंद्रात आणि राज्यात सरकार आले. जनतेला अपेक्षित असलेला विकास साधण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सन्मान देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन मधून सुमारे १४ कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाल्याबद्दल श्री. राणे यांचे अभिनंदन करण्यात आले, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Article image


हा विकास निधी आणण्याचे श्रेय हे खासदार नारायण राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, गणेश कुशे, बाबा परब, मंदार केणी, यतीन खोत, आबा हडकर, सचिन आंबेरकर, जीवन भोगावकर, पंकज सादये, ललित चव्हाण, मिलिंद झाड, श्याम झाड, रवींद्र टेंबुलकर, अन्वेशा आचरेकर, सेजल परब, पूजा करलकर, राणी पराडकर, सौ. टेंबुलकर यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


श्री. मोंडकर म्हणाले, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून मालवण तालुक्यासाठी १४ कोटींपेक्षा जास्त थेट निधी प्राप्त झाला आहे. मालवण शहर आणि वायरी भूतनाथ जिल्हा परिषद गट या गटासाठी पहिल्या टप्प्यात ४ कोटी ७० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. मंजूर झालेल्या कामांची प्रक्रिया पालकमंत्री नितेश राणे स्थानिक तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्षांना सूचना देऊन आणि त्यांच्यामार्फत पालकमंत्र्यांनी मंजूर करण्याची होती. त्यामुळे या सर्व विकास कामांचे १०० टक्के क्रेडिट हे खासदार नारायण राणे आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना जाते. कारण ही सर्व कामे त्यांच्या सूचनेनुसारच मंजूर झाली आहेत. या कामांचे श्रेय मित्र पक्षांकडून घेतले जात असले तरी या कामांचे प्रस्ताव भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सुचवल्यानुसारच करण्यात आले होते. याबाबतचे पुरावेही श्री. मोंडकर यांनी सादर केले.


ते पुढे म्हणाले, जिल्हा नियोजन मधून प्राप्त झालेल्या निधीमध्ये मालवण शहरासाठी पहिल्या टप्प्यात नगरोत्थानमधून २ कोटी ६५ लाख रुपये इतका भरीव विकास निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये शहराची पर्यटनाची ओळख अजून दृढ व्हावी यासाठी पर्यटन पूरक प्रवेशद्वार उभारण्यासाठी १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शहरात रिक्षा व्यवसायाचे पर्यटनातील योगदान लक्षात घेऊन केरळ, कर्नाटकच्या धर्तीवर पर्यटन पूरक रिक्षा स्टॅन्ड बनवण्यासाठी १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. पर्यटन पूरक लाईट व्यवस्था अधिक सुधारण्यासाठी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शहरातील देऊळवाडा पूल येथे आकर्षक पद्धतीचे रेलिंग बसवण्यासाठी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दलित वस्तीतील नागरिकांच्या मागणीनुसार व्यायाम शाळा उभारण्यासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शहरातील नादुरुस्त गटार व्यवस्था आणि काही करविंग पॉईंट्स विकसित करण्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. वायरी भूतनाथ जिल्हा परिषद गटामध्ये पर्यटन आणि मच्छीमार समाजासाठी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यात वायरी समुद्रकिनाऱ्यावरील मोरेश्वर देवस्थानाकडे पर्यटन पूरक सुविधा निर्माण करण्यासाठी आणि मच्छीमारांसाठी जेटी बांधण्यासाठी २२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जाधव वाडी रामदास मठ रेवंडकर पानंद येथील मासळी वाहतुकीसाठी रस्ता बनवण्यास २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निशानकाठी येथे पर्यटन पूरक विकास करण्यासाठी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तारकर्ली बंदर जेटीवर खाडी किनारा भाग सावंतवाडी तलावासारखा विकसित करण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मच्छीमारांच्या मागणीनुसार निवारा शेड उभारण्यासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 


केंद्रात आणि राज्यात असलेले भाजप सरकार १०० टक्के मालवणच्या नागरिकांसोबत आहे. येत्या काळात पर्यटन आणि मच्छिमार विकास क्षेत्रांमध्ये मालवणला अजून भरीव निधी मिळेल अशी अपेक्षाही श्री. मोंडकर यांनी यावेळी व्यक्त केली.


सौजन्य | मालवण ब्यूरो

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स