आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण कुडाळ मतदारसंघात २४ कोटींचा विकासनिधी मंजूर.
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण कुडाळ मतदारसंघात २४ कोटींचा विकासनिधी मंजूर.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती.
मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण कुडाळ मतदारसंघात जिल्हा वार्षिक योजनतेतून पहिल्या टप्प्यात २४ कोटींचा विकासनिधी मंजूर झाला आहे. याबाबत माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत यांनी दिली आहे.
मालवण कुडाळ मतदार संघात आता पहिल्या टप्प्यात २४ कोटी निधी मंजुरी बाबत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांचे विशेष आभार व्यक्त करताना खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांसह महायुती सरकारचे आभार व्यक्त केले आहेत. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आगामी काळातही मोठया प्रमाणात विकासनिधी प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदार संघात जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नाशील असणारे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जनसुविधा अंतर्गत ४ कोटी ६८ लक्ष, नागरी सुविधा अंतर्गत १ कोटी ५० लक्ष, ग्रामीण मार्गसाठी २ कोटी ५० लक्ष, क वर्ग यात्रास्थळ विकास साठी १ कोटी, इतर जिल्हा मार्गसाठी १ कोटी ५० लक्ष, नवीन ट्रान्सफार्मर व स्ट्रीट लाईट साठी २ कोटी, शाळा इमारती साठी १ कोटी ६० लक्ष, लहान मासेमारी बंदरांचा विकास १ कोटी ७७ लक्ष असा सुमारे २४ कोटी निधी वरील विविध हेड खाली पहिल्या टप्यात मंजूर झाला आहे.
गेल्या दहा महिन्यात आमदार निलेश राणे यांनी मतदारसंघात शेकडो कोटी निधी मंजूर करून आणला. देवबाग किनारपट्टी सुरक्षेच्या दृष्टीने एकाचवेळी १५८ कोटींचा निधी मंजूर करून घेत आमदार निलेश राणे यांच्या कामाची धमक दिसून आली. यापुढील काळतही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निलेश राणे अधिकाधिक विकासनिधी मंजूर करून आणतील. त्यांचे व्हिजन असलेला आदर्श मतदार संघ बनवतील असा विश्वास श्री. दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...