मालवण आयटीआय मध्ये अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाना प्रवेश घेण्याचे आवाहन.
मालवण आयटीआय मध्ये अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाना प्रवेश घेण्याचे आवाहन.
मसुरे | प्रतिनिधी : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक विद्यालय केंद्रांमध्ये पायाभूत सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग करून संस्थेच्या वेळेव्यतिरिक्त वेळेत अल्पमुदत अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. या उपक्रमामधून अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी मिळावी, रोजगारक्षमतेत वाढ व्हावी व कौशल्य विकासाला चालना मिळावी हा शासनाचा उद्देश आहे.
मा. प्रधानमंत्री, श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता अल्पमुदत अभ्यासक्रम सुरू करण्याचा ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रम संपन्न होणार आहे. मालवण आयटीआय येथे पाच कोर्सेस सुरु होणार आहेत. आयटीआय बाहेरील विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात प्रवेश घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. उद्घाटन कार्यक्रमाला देखील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्था मालवणचे प्राचार्य श्री. सचिन संखे यांनी केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'दुकानदारांनो सावधान...!'
'दुकानदारांनो सावधान...!'ज्येष्ठ पर्यटन व्यावस...
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त भंडारी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात.
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंत...
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या