पोईप येथे ६ ऑक्टोबर रोजी डबलबारी भजनाचा सामना.
पोईप येथे ६ ऑक्टोबर रोजी डबलबारी भजनाचा सामना.
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आदर्श रिक्षा संघटना व ग्रामस्थ पोईप यांच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजेचे औचित्य.
पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील पोईप येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आदर्श रिक्षा संघटना व ग्रामस्थ पोईप यांच्या वतीने सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर २५ रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे तरी भाविकांनी दर्शनाचा व तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन पोईप रिक्षा संघटना व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
विशेष कार्यक्रम -सायं .४ वाजता पोईप गावातील स्थानिक ग्रामस्थांची सुस्वर भजने, सायं.६ वाजता श्री समर्थ समई नृत्य - खुडी देवगड. रात्री ८-३० वाजता २०×२० डबल बारी भजनांचा जंगी सामना, बुवा श्री हेमंत तेली, (श्री पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ फोंडाघाट) विरुद्ध बुवा श्री. सुजीत परब (श्री कोटेश्वर भजन मंडळ हरकुळ बुद्रुक.)
उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)