मसुरे देऊळवाडा माऊली मंदिर येथे ६ ऑक्टोबर रोजी धार्मिक कार्यक्रम.
मसुरे देऊळवाडा माऊली मंदिर येथे ६ ऑक्टोबर रोजी धार्मिक कार्यक्रम.
मसुरे | प्रतिनिधी : कसबा मसुरे गावची प्रमुख देवता देऊळवाडा येथील श्री देवी माउली मंदिरात, ६ ऑक्टोबर २०२५ रोजी नवचंडीयाग आयोजीत करण्यात आला आहे. यानिमित्त, सकाळी ७. ३० पासून ओटी भरणे तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून दुपारी २ वाजता महाप्रसाद होणार आहे कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन गाव रहाटी कसबा मसुरे यांच्या वतीने करण्यात आले आहे अशी माहिती मिळत आहे.
'नवचंडी याग' हा दुर्गा सप्तशती पाठाद्वारे केला जाणारा एक शक्तिशाली यज्ञ मानला जातो. हा यज्ञ आरोग्य, समृद्धी, यश मिळवण्यासाठी तसेच सामान्यांच्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी केला जातो. यात दुर्गा सप्तशती ग्रंथाचे नऊ वेळा पठण केले जाते आणि त्यातील एका पाठाचे हवन केले जाते. हा यज्ञ सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि दुःखांपासून मुक्ती देतो अशी सश्रद्ध आस्था आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)