श्री. देवी सातेरी मंदिर मार्गावरील वीज खांब वीज वितरणाच्या माध्यमातून बदलला.
श्री. देवी सातेरी मंदिर मार्गावरील वीज खांब वीज वितरणाच्या माध्यमातून बदलला.
धोकादायक खांब बदलण्यासाठी शहरप्रमुख व माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचा पाठपुरावा.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील देऊळवाडा (आडवण ) येथून श्री. देवी सातेरी मंदिरकडे ( मराळवाडा) जाणाऱ्या रस्त्यालगत असणारा वीज खांब जीर्ण झाला होता. धोकादायक खांब कोसळून वीज पुरवठा खंडित होण्याची भितीदायक शक्यता होती. याबाबत नागरिकांच्या मागणीनुसार शिवसेना शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक दिपक पाटकर यांनी वीज वितरणकडे पाठपुरावा करून नवीन वीज खांब बसवण्याची कार्यवाही पूर्ण केली अशी माहिती मिळत आहे.
आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात जनतेला तत्पर सेवा सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे, यावेळी श्री. पाटकर यांनी सांगितले. या कामात वीज वितरण अधिकारी मयेकर, कॉन्ट्रॅक्टर गोवेकर यांचे सहकार्य लाभले असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी नगरसेवक अरविंद मोंडकर, शाखाप्रमुख प्रमोद मराळ, जितु मराळ, अशोक मराळ, विश्वास परब, बाळा आचरेकर, अर्जुन चव्हाण, दिपक मराळ, उदय वीर, मयू मराळ, दिलीप मराळ, सौ. जागृती मराळ, सौ. मनाली मराळ, सौ. शुभांगी मराळ यांसह नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी या कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले आणि शहरप्रमुख दिपक पाटकर यांचे आभार मानले.
सौजन्य: मालवण ब्यूरो
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)