कणकवली पटवर्धन चौकात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे जल्लोषात स्वागत
राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबीद नाईक यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांची उपस्थिती
कणकवली |उमेश परब : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे कणकवली नगरीत राष्ट्रवादी तर्फे कणकवली पटवर्धन चौक येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कणकवलीत कुणीही मोठा राजकीय नेता आला की त्यांचे कणकवली पटवर्धन चौकात स्वागत करण्याचा एक अलिखित परंपरा आहे. राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबीद नाईक यांनी जयंत पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त ही परंपरा सुरु ठेवत कणकवली पटवर्धन चौकात जयंत पाटील यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले. या सोबत जयंत पाटील यांनी अबिद नाईक यांच्या घरी सदिच्छा भेट दिली नाईक कुटुंबीयांनी पाटील यांचे यथासांग स्वागत करत शुभेच्छा दिल्या. या स्वागताचा दरम्यान राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, विलास गावकर, सुभाष उर्फ बाबू सावंत, सावळाराम अणावकर, संदीप राणे, नम्रता कुबल, स्नेहल पाताडे, अनिस नाईक, इम्रान शेख, दिलीप वरने, अमित केतकर, विशाल पेडणेकर, सचिन सदडेकर, सतीश पाताडे, वसीम फकीर, विशाल ठाणेकर, उदय भोसले, सुरेश गवस, एम डी सावंत, दीपेश सावंत, निशिकांत कडुलकर, गणेश चौगुले, राजू वर्दम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या स्वागता प्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी अबिद नाईक यांनी पटवर्धन चौकात भला मोठा पुष्पहार घालून जयंत पाटील यांचे कणकवली नगरीत स्वागत केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)