ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनास अपंग निधी वाटप विषयीची बाब आणून देण्यात आली आहे : महेश कांदळगांवकर.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनास अपंग निधी वाटप विषयीची बाब आणून देण्यात आली आहे : महेश कांदळगांवकर.

आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनास अपंग निधी वाटप विषयीची बाब आणून देण्यात आली आहे : महेश कांदळगांवकर.

Article image

मालवण शहरातील अपंग बांधवांना दिवाळीपूर्वी अपंग निधी वाटप करण्याविषयी नगर परिषदेकडे केलेल्या मागणी बाबत माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांची माहिती. 


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवणचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा समन्वयक श्री. महेश कांदळगांवकर यांनी एका प्रसिद्धीपत्राद्वारे दिलेल्या माहितीनुसार, मालवण नगरपरिषद हद्दीतील अपंग बांधवाना शासन धोरणानुसार, दरवर्षी शहरातील जवळपास १२० अपंग बांधवांना जो ५% अपंग निधी मिळतो त्याचे त्यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणावर जवळपास ९ लाख रुपयांचे वाटप केले जाते. शक्यतो चतुर्थी आणि दिवाळी या सणांच्या कालावधीत या अपंग निधीचे वाटप केले जाते.  परंतु मागच्या वर्षी विधानसभा निवडणूक कालावधीत आचरसंहितेचे कारण दाखवून हा निधी निवडणूका कार्यक्रम संपल्यानंतर जानेवारी महिन्यात देण्यात आला होता असे श्री. कांदळगांवकर यांनी प्रसिद्धीपत्रात म्हणताना या वर्षी सुद्धा नजीकच्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांची जी निवडणूक होऊ घातली आहे, त्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर एका पुनरावृत्तीच्या शक्यता टाळण्याची पूर्वकाळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. गेल्यावर्षी प्रमाणे अपंग निधी वाटपास निवडणूकिचे कारण येऊ नये आणि दिवाळी पूर्वी अपंग निधीचे वाटप करावे यासाठी आज मालवण नगरपरिषद प्रशासनाची भेट घेऊन मागणी करण्यात आली आहे अशी माहिती श्री. महेश कांदळगांवकर यांनी दिली आहे.


या बाबत प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर अपंग निधी वितरित केला जाईल याबाबत आश्वासित केले गेले आहे असे श्री. कांदळगांवकर यांनी नमूद केली असून, ही बाब कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनासही आणून देण्यात आली आहे असेही श्री. महेश कांदळगांवकर यांनी विशेष नमूद केले आहे.

  


 


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स