देवी भैरवी देवालयातील भजन महोत्सवाचा समारोप.
देवी भैरवी देवालयातील भजन महोत्सवाचा समारोप.
समारोप समारंभ उद्घाटक उद्योजक महेश कांदळगांवकर यांनी आजच्या धकाधकीच्या काळात भजनाच्या माध्यमातून होत असलेले प्रबोधन व सकारात्मकतेची केली विशेष प्रशंसा.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण बाजारपेठेतील संतसेना महाराज मार्गावरील भैरवी देवालयातील भजन महोत्सवाचा समारोप उद्योजक तथा माजी नगराध्यक्ष श्री. महेश कांदळगावकर यांच्या हस्ते झाला. प्रास्ताविकात ॲड. पलाश चव्हाण यांनी भैरवी मंदिरच्या उभारणीचा व भजन महोत्सव आयोजनाचा आढावा घेतला. भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळाचे अध्यक्ष अंकुश चव्हाण व नाभिक समाजाचे माजी तालुकाध्यक्ष विजय शिवा चव्हाण यांनी स्वागत केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर, उद्योजक प्रदिप मुंबरकर, दिपा शिंदे, माजी तालुकाध्यक्ष विजय चव्हाण, मनोज चव्हाण आदी उपस्थित होते.
श्री देवी भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळाने सलग तेरा वर्षे भजन सेवेतून देवीची आराधना आणि आशीर्वाद मिळविलेले आहेत. शिस्तबद्ध नियोजन आणि आदर्शवत अशाप्रकारे परमेश्वर भेटीचा आनंद भजनात तल्लीन होणाऱ्या भाविकांना होत असतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात भजनातून होणारे नामस्मरण पुढील पिढ्यांना दिशादर्शक ठरणार आहे. भजनातून होत असलेले संस्कार आणि दिशादर्शक प्रबोधनातून निर्माण होणारी सकारात्मक उर्जा सर्वांसाठीच महत्वाची असते, असे प्रतिपादन उद्योजक तथा मालवणचे माजी नगराध्यक्ष श्री. महेश कांदळगावकर यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना बुवा सुनील परूळेकर म्हणाले, "मंडळ नाविन्यपूर्ण उपक्रम दरवर्षी आयोजित करून नामांकीत भजनी बुवांना मंदिरात आणून त्यांच्याकडून देवीची भजनरुपी सेवा करून घेते. त्याचा फायदा सर्व समाजाला होत असल्याने मंडळाचे कार्य गौरवास्पद आहे. मंडळाचे कार्यकर्ते दिशादर्शकपणे कार्यरत असून आपण त्यांच्या पाठिशी सदैव राहणार आहोत. संगीत आणि नामस्मरण हे माणसाच्या जीवनातील महत्वाचे भाग आहेत. भैरवी मित्रमंडळ संगीत आणि नामस्मरणात दोन्ही ठिकाणी आपल्या दर्जेदार उपक्रमातून पुढाकार घेत आहे. परमेश्वराला हाक घालण्यासाठी नामस्मरण महत्वाचे आहे, ते याठिकाणी सातत्याने होताना दिसत आहे. तुम्ही नामस्मरणातून देवाला साद दिली की तो त्याच प्रेमाने तुमच्यासोबत येत असतो, यामुळे या मंडळाचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे", असेही त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन ॲड. पलाश चव्हाण यांनी केले. महोत्सव यशस्वीतेसाठी राजन सकपाळ, बबन सकपाळ, उदय चव्हाण, मिहीर चव्हाण, राहुल चव्हाण, रोहन चव्हाण, कांता चव्हाण, उत्तम चव्हाण, ललीत चव्हाण, हेमंत चव्हाण, चिन्मय चव्हाण, किशोर चव्हाण, बाली चव्हाण, लवू चव्हाण, दिलीप वायंगणकर, उद्देश चव्हाण, जगदीश वालावलकर, संजय चव्हाण, कौशल वस्त, जयेश कुबल, आप्पा चिपकर तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी भैरवी मंदिरातील भजन महोत्सवात सलगपणे दहा वर्षे भजनसेवा करणारे प्रसिद्ध बुवा सुनील परूळेकर यांचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच मंदिराच्या सेवाभावी उपक्रमांत नेहमीच स्वच्छतेची जबाबदारी संभाळणारे आप्पा चिपकर यांचाही भेटवस्तू, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मालवण केबल नेटवर्कचे मुकेश बावकर यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. वडिलांच्या पश्चात साऊंड सर्व्हर्स व्यवसायात आपली ओळख बनविणारे भावेश लाड यांचाही याप्रसंगी सत्कार मंडळाच्यावतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर यांच्या कवितांचा जागर.
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर...
आमदार निलेश राणे यांनी आम्हा दशावतार कलावंताना सरकार दरबारी न्याय मिळवून दिल्याची दशावतार कलावंतांची प्रतिक्रिया.
आमदार निलेश राणे यांनी आम्हा दशावतार कलावंता...
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय लेखन सदराची तडाखेबंद शतकपूर्ती..!
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय ल...