किल्ले भगवंतगडवर 'पहिले तोरण गडाला' उपक्रम.
किल्ले भगवंतगडवर 'पहिले तोरण गडाला' उपक्रम.
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, सिंधुदुर्ग विभागाच्या उपक्रमाची प्रशंसा.
आचरा | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील चिंदर गावच्या किल्ले भगवंतगडवर, गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने, 'पहिले तोरण गडाला' हा उपक्रम संपन्न झाला. २ ऑक्टोबर विजयादशमी दिवशी सकाळी गडावरील सिध्देश्वर मंदिराला तोरण बांधले त्यानंतर गडपूजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा केली. शस्त्रपूजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या उपक्रमाला, गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाचे प्रथमेश चव्हाण, वरद जोशी, स्वप्नील शिर्सेकर, हर्षद मडवळ, नारायण पाताडे, राजू पालकर, ग्रामपंचायत सदस्य केदार उर्फ पप्पू परूळेकर, भोगले, ग्रामस्थ आदी उपस्थित होते तसेच गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, सिंधुदुर्ग विभागाच्या या उपक्रमाची प्रशंसा होत आहे अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
वायंगणी श्री स्वामी समर्थ मठाला उद्योजक डॉ. दीपक परब यांच्याकडून लॅपटॉप व प्रिंटर भेट.
पळसंब येथील पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ.
पळसंब येथील पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ.सरपं...
आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून चिंदरमध्ये शालेय मुलांना वह्यांचे वाटप