चिवला बीच येथे सिंधुदुर्ग महाविद्यालय आयोजित किल्ले वाळूशिल्प स्पर्धा संपन्न.
चिवला बीच येथे सिंधुदुर्ग महाविद्यालय आयोजित किल्ले वाळूशिल्प स्पर्धा संपन्न.
३ ऑक्टोबर रोजी बक्षिस वितरण.
मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती, पर्यटन व्यावसायिक महासंघ, युवा टुरिझम क्लब तसेच एनसीसी, एनएसएस व भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन सप्ताह २०२५ च्या निमित्ताने चिवला बीच येथे किल्ले वाळूशिल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत माध्यमिक गटात डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग, कनिष्ठ महाविद्यालय गटात भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय मालवण, आणि वरिष्ठ महाविद्यालय गटात स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर व इतर प्राध्यापक उपस्थित होते. स्पर्धेला तालुक्यातील शाळा व कॉलेजचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून विद्यार्थ्यांनी विविध गडकिल्ले व दुर्गांची आकर्षक वाळूशिल्पे साकारली होती. स्पर्धेचे परीक्षण मालवण मधील शिल्पकार सुशांत तायशेटे यांनी केले.
८ वी ते १० वी माध्यमिक शाळा गटात प्रथम - डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल, देवबाग, द्वितीय - अ.शि.दे. टोपीवाला हायस्कूल (मुले), तृतीय - लक्ष्मीबाई टोपीवाला हायस्कूल कन्याशाळा मालवण, प्रथम उत्तेजनार्थ - भंडारी ए.सो. हायस्कूल मालवण, द्वितीय उत्तेजनार्थ - अ.शि. दे. टोपीवाला हायस्कूल (मुली), तृतीय उत्तेजनार्थ - भरतगड इंग्लिश स्कूल मसुरे, कनिष्ठ महाविद्यालय गटात प्रथम - भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय मालवण, द्वितीय - रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय मालवण (मुले), तृतीय - रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय मालवण (मुली), वरिष्ठ महाविद्यालय गटात प्रथम - स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण, द्वितीय- दि आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, आचरा या शाळा - महाविद्यालयांनी यश प्राप्त केले.
या स्पर्धेसाठी प्रा. रोहिणी फाटक, डॉ. हंबीरराव चौगले, डॉ. देविदास हारगिले, डॉ. एम. आर. खोत, प्रा. प्रमोद खरात, प्रा. अन्वेषा कदम यांनी पंचांची जबाबदारी निभावली.
यावेळी किल्ला सिंधुदुर्ग प्रेरणोस्तव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, उपाध्यक्ष डॉ. ज्योती बुवा तोरस्कर, कला शिक्षिका राखी अरदकर, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, प्रा. हसन खान, प्रा. प्रमोद खरात आदी तसेच इतर शाळा व कॉलेजचे शिक्षक उपस्थित होते. डॉ. सुमेधा नाईक यांनी निकाल जाहीर करत आभार मानले.
स्पर्धेची बक्षिसे किल्ले प्रेरणोत्सव समितीने पुरस्कृत केली असून बक्षीस वितरण ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे पर्यटन सप्ताह सांगता समारंभात होणार आहे अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
हेरिटेज टूर गाईड प्रमाणपत्र अभ्यासक्रमांतर्गत १९ फेब्रुवारी रोजी 'मालवणचा हेरिटेज वॉक.'
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.