ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
मातृत्व आधार फाऊंडेशनच्या वतीने नवदुर्गा पूजन कार्यक्रम उत्साहात.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मातृत्व आधार फाऊंडेशनच्या वतीने नवदुर्गा पूजन कार्यक्रम उत्साहात.

प्रकाशन: 01 Oct 2025 09:26 PM
वाचन संख्या 115

मातृत्व आधार फाऊंडेशनच्या वतीने नवदुर्गा पूजन कार्यक्रम उत्साहात. 


मालवण | ब्यूरो न्यूज : मातृत्व आधार फाउंडेशनाच्या वतीने वायरी भूतनाथ येथे, १ ऑक्टोबर २०२५ रोजी नवदुर्गा पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष लुडबे यांच्यासह माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर तसेच डॉ. राहुल पंतवलावकार, सानिका केअर सेंटरच्या सानिका तुळसकर, ज्येष्ठ लेखिका वैशाली पंडित, प्रा. रामचंद्र काटकर, पर्यटन व्यावसायिक बाबू बिरमोळे, उपसरपंच माणगावकर आदी उपस्थित होते. 

Article image


यावेळी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना सानिका तुळसकर म्हणाल्या की, त्यांच्या वडिलांनी आणि बहिणींनी जो पाठिंबा दिला त्यामुळे त्या समाजसेवेच्या क्षेत्रात आल्या. यात त्यांना त्यांच्या पतीची मोलाची साथ लाभली. त्या, सानिका केअर टेकर सेंटर येथे त्याच ऊर्जेतून रुग्ण सेवा करतात आणि त्यात समाधान वाटते. कोणतेही काम कमी दर्जाचे नसते. पण समाजाचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे असे सानिका तुळसकर यांनी बोलताना विशेष अधोरेखित केले.

Article image


यावेळी डाॅ. राहुल पंतवालावकर यांनी कुटुंब व्यवस्था तसेच संस्कार, आरोग्य आणि व्यसनाधिनतेवर मार्गदर्शन केले. आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या कुटुंबाचे हित दडलेले आहे. आपल्या घरात मुलांना सांभाळायचे असेल तर त्यांचे ७ ते १३ हे वर्ष महत्वाचे आहे. मुले ही अनुकरणाने शिकत असतात. शिस्त आणि स्वातंत्र्य हे मुलांच्या शिकवणीत महत्त्वाचे आहे. आज मुलांना संस्कार देणाऱ्या शिक्षकांना शिकविणारे पालक समाजात आढळून येत आहेत. पालकांनी सजग होणे आवश्यक आहे. 'सायंकाळी सातच्या आत घरात,' ही आपल्या पूर्वजांची शिकवण आपण विसरत चाललो आहे. संस्कारी स्त्रियाच संस्कारी समाज निर्माण करू शकतात. 


नुकताच कोमसापचा केंद्रीय पुरस्कार प्राप्त झालेल्या

ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांनी मातृत्व आधार फाउंडेशनच्या उपक्रमांना पाहून भविष्यकाळ वाईट नाही असा आशावाद व्यक्त केला. मुलांना वाचनाची सवय लावली पाहिजे. किमान वर्तमानपत्रे तरी वाचली गेली पाहिजेत असे त्यांनी मार्गदर्शनपर आग्रह केला.


कार्यक्रमाची प्रस्तावना करताना माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर म्हणाले की, पडद्याआड राहून मातृत्व आधार कार्य करत असते. राजकीय उद्देश बाजूला ठेवून जनसामान्यांना मदतीला जावून जाणे हे मातृत्वाचे काम आहे. समाजाची निस्वार्थपणे सेवा करणे हे मातृत्वाचे व्रत आहे. संस्थापक संतोष लुडबे यांचे कार्य शब्दलांपलीकडचे आहे. अनेक निराधार मुलांना त्यांनी मदतीचा हात दिल्याचेही श्री. कांदळगांवकर म्हणाले.


या कार्यक्रमात विधवा महिलांचा साडी - चोळी नारळाने ओटी भरून सन्मान करण्यात आला. यावेळी मनोज खोबरेकर, स्मृती कांदळगांवकर, उमा लुडबे, संदीप बोडवे, दीक्षा लुडबे, हरीष वेंगुर्लेकर व महिला वर्ग उपस्थित होता.


Article image


यावेळी पर्यावरणीय क्षेत्रात लिखाण केल्याबद्दल पत्रकार संदीप बोडवे यांचा मातृत्व आधार फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...

11 Aug 2026 281

लोकप्रिय टॅग्स