ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
पंतप्रधान स्व-निधी योजनेचा लाभ घ्यायचे मालवण नगरपरिषदेचे आवाहन..
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

पंतप्रधान स्व-निधी योजनेचा लाभ घ्यायचे मालवण नगरपरिषदेचे आवाहन..

पंतप्रधान स्व-निधी योजनेचा लाभ घ्यायचे मालवण नगरपरिषदेच्या वतीने आवाहन.


मालवण | ब्यूरो न्यूज : केंद्र सरकारने पथविक्रेत्यांसाठी सुरू केलेल्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेची मुदत आता ३१ मार्च, २०३० पर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मालवण शहरातील सर्व पथविक्रेते, फेरीवाले, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, हातगाडी चालक आणि रस्त्यांच्या कडेला बसणाऱ्या व्यावसायिकांनी -पुढे यावे, असे आवाहन मालवण नगरपरिषदेने केले आहे.



या योजनेंतर्गत मिळणाऱ्या कर्जाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता प्रथम १०,००० रुपयांऐवजी १५,००० रुपये आणि दुसऱ्यावेळी २० हजार रुपयांऐवजी २५ हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. तिसऱ्यांदा कर्ज घेणाऱ्यांसाठी ५०,००० रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांनी डिजिटल व्यवहार केल्यास त्यांना कॅशबॅकचाही लाभ मिळणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत 'लोककल्याण मेळावा' विशेष मोहीम राबवली जात आहे. या मेळाव्यात नवीन अर्ज स्वीकारणे, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करणे, लाभार्थ्यांना डिजिटल व्यवहारांसाठी मार्गदर्शन करणे, अन्नपदार्थ विक्रेत्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन, लाभार्थ्यांचे प्रोफायलिंग करून शासनाच्या इतर योजनांचाही लाभ देणे आदी कामे होतील. या योजनेचा लाभ घ्‍यावा असे आवाहन मालवण नगरपरिषदेच्‍यावतीने करण्‍यात येत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स