ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
पूरग्रस्तांसाठी अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने आर्थिक स्वरुपातून देखिल मदत.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

पूरग्रस्तांसाठी अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने आर्थिक स्वरुपातून देखिल मदत.

प्रकाशन: 30 Sep 2025 03:30 PM
वाचन संख्या 55

पूरग्रस्तांसाठी अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने आर्थिक स्वरुपातून देखिल मदत.




मसुरे | प्रतिनिधी : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक स्वरुपातूनही मदतीचा हात पुढे करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. सलग एक महिन्यापासून शहर व जिल्ह्यात सातत्याने पडत असलेल्या पावसाचा शेतकरी वर्गास व सर्वसामान्य नागरीकास मोठा नुकसान सहन करावा लागत आहे. या पार्श्वभुमीवर या नैसर्गिक आपत्ती काळात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अर्थिक स्वरुपातील मदतीचा हातभार लागणार आहे. ही मदत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी आर्थिक मदतीचा धनादेश तहसीलदार विनायक मगर यांच्याकडे सुपूर्द केला. 

Article image


यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, चंद्रकांत गवंडी, संतोष पराणे, श्रीशैल गवंडी, शिवशरण अचलेर, गिरीश पवार, बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, चित्तरंजन अगरथडे, श्रीकांत मलवे, गणेश इंगळे, सागर गोंडाळ, आकाश चुंगीकर, गवळी, शंकर मलवे, समर्थ स्वामी, सागर दळवी, ओंकार महाडीक, सचिन कटकधोंड

इत्यादी उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्ती व संकटकाळात श्री स्वामी समर्थांच्या आशिर्वादाने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीकडून समितीचे सर्व उपक्रम सांभाळून प्रशासनास नेहमीच अनेक प्रकारे सहकार्य करण्यात येते या कार्याची परंपरा मंदीर समितीने यंदाही जोपासली आहे असे महेश कल्याणराव इंगळे (चेअरमन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट) यांनी सांगितले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स