ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
​मालवण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

​मालवण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू.

​मालवण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू.

Article image


दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसोबतच दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची संधी.

            

मसुरे | प्रतिनिधी : मालवण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI), नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया २१ मेपासून सुरू झाली आहे. यावर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसोबतच दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आयटीआयने इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.


इच्छुक विद्यार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (admission.dvet.gov.in) ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत. अर्ज भरल्यानंतर, विद्यार्थ्यांनी जवळच्या आयटीआय केंद्रावर जाऊन आपल्या अर्जाची पडताळणी (व्हॅरिफिकेशन) करणे आवश्यक आहे. पडताळणीनंतरच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी व्यवसायांचे पर्याय सादर करता येतील.

​

ही प्रवेश प्रक्रिया गुणवत्ता, आरक्षण आणि ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे (CAP) पार पडणार आहे. ​आयटीआय मालवण येथे यंदाच्या प्रवेशासाठी ४ विविध व्यवसायांमध्ये एकूण १३२ जागा उपलब्ध आहेत. यामध्ये

१. मेकॅनिक डिझेल, २. वेल्डर, ३. ड्रेस मेकिंग, ४. रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग टेक्निशियन अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे:


​प्रशिक्षणार्थींना प्रतिमाह विद्यावेतन योजना, प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना अशा विविध योजनांचा लाभ दिला जातो. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत संस्थेमध्येच विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती दिली जात आहे. ​​अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आयटीआय मालवण संस्थेमध्ये प्रवेश घेऊन रोजगार, स्वयंरोजगार व उच्च शिक्षणाच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य बी. पी. सोनवणे, प्रभारी प्राचार्य ए. जी. खेडेकर तसेच संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स