मालवणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ५ ऑक्टोबरला श्री विजयादशमी उत्सव.
मालवणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ५ ऑक्टोबरला श्री विजयादशमी उत्सव.
मालवण | ब्यूरो न्यूज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून मालवण तालुका शाखेने यावर्षीचा श्री विजयादशमी उत्सव ५ ऑक्टोबरला सायंकाळी ५ ते ६:१५ या वेळेत कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.
विजयादशमी हा हिंदू संस्कृतीतील असूरी शक्तींवरील दैवी शक्तीच्या विजयाचे प्रतीक असलेला उत्सव. समस्त जीवसृष्टीच्या कल्याणाचा विचार घेऊन साजरा केला जातो. १९२५ साली विजयादशमीच्या मंगल मुहूर्तावर स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला लवकरच शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक वाटचालीच्या निमित्ताने हा विजयादशमी उत्सव विशेष असणार आहे. या कार्यक्रमात संघाने आजपर्यंत केलेली वाटचाल आणि भविष्यातील समाज परिवर्तन कार्याचा आढावा घेण्यात येणार आहे.
या विशेष कार्यक्रमासाठी डॉ. बापूजी साबजी परब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच विश्व हिंदू परिषद रत्नागिरी विभाग मंत्री विवेक वैद्य हे वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. निवेदक म्हणून मालवण तालुका कार्यवाह रत्नाकर कोळंबकर हे काम पाहणार आहेत.
या कार्यक्रमात नागरिकांनी, संघ स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.