ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
पर्यावरणविषयक प्रशिक्षण कार्यक्रमात मालवणचे संदीप बोडवे व ऐश्वर्य मांजरेकर यांचा डेहराडून येथे सहभाग
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

पर्यावरणविषयक प्रशिक्षण कार्यक्रमात मालवणचे संदीप बोडवे व ऐश्वर्य मांजरेकर यांचा डेहराडून येथे सहभाग

पर्यावरणविषयक प्रशिक्षण कार्यक्रमात मालवणचे संदीप बोडवे व ऐश्वर्य मांजरेकर यांचा डेहराडून येथे सहभाग. 



मालवण | ब्यूरो न्यूज : केंद्रीय अकॅडमी राज्य वन सेवा, डेहराडून तर्फे आयोजित 'जंगले आणि वन्यजीव संवर्धनात नागरिक विज्ञानाच्या भूमिके' वरील प्रशिक्षण कार्यक्रमात मालवणचे संदीप बोडवे व ऐश्वर्य मांजरेकर यांनी सहभाग घेतला. डेहराडून येथे संपन्न झालेल्या या प्रशिक्षण म्हणून देशभरातून निवडक ३० जण सहभागी झाले होते.


या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करताना भारतीय वन्यजीव संस्थेचे संचालक गोविंद सागर भारद्वाज म्हणाले की, सध्या हवामान बदलाचे आव्हान मोठे होत आहे आणि त्याचे प्रतिकूल परिणाम समस्या वाढवत आहेत. भविष्यात पर्यावरण वाचवायचे असेल तर मुलांना बालपणा पासूनच निसर्गाचे महत्त्व शिकविले पाहिजे. नागरिक विज्ञानाशिवाय पर्यावरणाचे रक्षण अशक्य आहे. 

Article image


सेंट्रल अकादमी ऑफ स्टेट फॉरेस्ट सर्व्हिसचे प्राचार्य ई. विक्रम म्हणाले, की, या उपक्रमामुळे केवळ पर्यावरण संरक्षण मजबूत होणार नाही तर मुलांना जबाबदार नागरिक बनण्यास देखील मदत होईल. जर आपल्याला पर्यावरण वाचवायचे असेल तर लहानपणापासूनच मुलांना निसर्ग, वनस्पती आणि पक्ष्यांशी जोडले पाहिजे. त्यांचे महत्त्व स्पष्ट केले पाहिजे. मोबाईल फोन सारख्या मनोरंजनाच्या तंत्रामुळे मुले हळूहळू निसर्गापासून दूर होऊ लागली आहेत. खरेतर निसर्गाकडून बरेच शिकण्यासारखे असते. शाळेच्या चार भिंती ओलांडून मुलांना निसर्गात नेवून शिकविले पाहिजे.

Article image


या सत्रात डॉ गोविंद सागर भारद्वाज (IFS), संचालक, भारतीय वन्यजीव संस्था (डब्ल्यूआयआय), डेहराडून, ई. विक्रम (IFS), प्राचार्य, सीएएसएफओएस, डेहराडून, अंकित गुप्ता, वैज्ञानिक-सी आणि सीडी, कॅसफोस, डेहराडून, डॉ स्वप्नाली गोळे, प्रकल्प शास्त्रज्ञ, डब्ल्यूआयआय, डेहराडून, रिद्धिमा करवा, वरिष्ठ कार्यक्रम समन्वयक, अर्थियन डेहराडून, कुहेलिका बिश्त, सहयोगी संघटक, सीएसए, डेहराडून, डॉ. सौम्या प्रसाद, संस्थापक, नेचर सायन्स इनिशिएटिव्ह, डेहराडून, राम दयाल वैष्णव, प्रमुख (सीएस अँड ई), द नॅचरलिस्ट स्कूल, बेंगळुरू, तन्नू सैनी, वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी, डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडिया, दिल्ली (एनडी), अभ्यासक सिपू कुमार यांनी मार्गदर्शन केले. 

Article image


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स